यंदाच वर्ष आयपीओचं: पेटीएम टॉप, 2022 मध्ये 2 लाख कोटींचे उद्दिष्ट
वर्ष 2021 नंतर 2022 मध्ये आयपीओची सर्वोत्तम कामगिरी राहण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्रा कॕपिटलने आगामी वर्षात 2 लाख कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नवी दिल्ली: कंपन्यांसाठी बाजारातून पैसे गोळा करण्यासाठी वर्ष 2021 अत्यंत फायदेशीर ठरले आहे. वर्ष 2021 मध्ये 63 कंपन्यांनी 1 लाख 18 हजार कोटी रुपये गोळा केले आहेत. आतापर्यंतचा बाजारातून पैसे गोळा करण्याचा सर्वोच्च रेकॉर्ड ठरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 1,18,704 कोटी रुपये गोळा केले आहे. वर्ष 2020 च्या तुलनेत साडेचार पट आणि वर्ष 2017 च्या तुलनेत 73 पटाहून अधिक आहे.
वर्ष 2020 मध्ये 15 कंपन्यांनी IPO माध्यमातून
26 हजार 613 कोटी गोळा केले. वर्ष 2017 मध्ये कंपन्यांनी 68,827 कोटी गोळा केले होते.
पेटीएम टॉप:
वर्ष 2021 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशने टॉप कामगिरी केली. तब्बल 18 हजार 300 कोटी रुपयांचे आयपीओ इश्यू केले होते. आॕनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॕटो 9300 कोटींच्या आयपीओसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वर्ष 2022 आयपीओचं!
वर्ष 2021 नंतर 2022 मध्ये आयपीओची सर्वोत्तम कामगिरी राहण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्रा कॕपिटलने आगामी वर्षात 2 लाख कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एका अहवालानुसार, पुढील वर्षात आयपीओचे 15 अरब डॉलरचे प्रस्ताव यापूर्वीच सेबीकडे दाखल झाले आहेत. तर 11 अरब डॉलरचे लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकदारांचा ‘सर्वोच्च’ प्रतिसाद!
एका अहवालानुसार, 59 कंपनीच्या आयपीओ पैकी 36 कंपन्यांना दहा पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी 6 कंपन्यांच्या आयपीओला 100 पटी पर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले. 8 आयपीओला तीन पट आणि उर्वरित 15 कंपन्यांच्या आयपीओला तीन पटीपर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती दिली आहे. एकूण इश्यू मध्ये रिटेलचा हिस्सा 10 पटीहून अधिक आहे.
आयपीओ म्हणजे काय?
आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते.स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.
इतर बातम्या:
Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?
Ipo performance in year 2021 know the report card