डिसेंबर महिन्यात 10 कंपन्या आणणार IPO, शेअर्स विकून 10000 कोटी उभारणार

RateGain चा 1,335 कोटी रुपयांचा IPO 7 ते 9 डिसेंबरदरम्यान लोकांसाठी खुला असेल. दुसरीकडे आनंद राठी वेल्थचा IPO 2 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी IPO साठी तयारी केलीय. यामध्ये ग्लोबल हेल्थ लिमिटेड, जी मेदांता ब्रँड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालवते, फार्मसी रिटेल चेन मेड प्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि हेल्थियम मेडेट यांचा समावेश आहे.

डिसेंबर महिन्यात 10 कंपन्या आणणार IPO, शेअर्स विकून 10000 कोटी उभारणार
IPO
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 11:17 AM

नवी दिल्लीः नोव्हेंबर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिना देखील IPO साठी खास असणार आहे. डिसेंबर महिन्यात 10 कंपन्या अशा आहेत, ज्या IPO द्वारे त्यांचे शेअर्स विकणार आहेत. या महिन्यात शेअर बाजारात सुमारे 10,000 कोटी रुपयांचा IPO येणार आहे. मर्चंट बँकिंगच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि तेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओचे सबस्क्रिप्शन अजूनही सुरू आहे. या कंपन्यांचे आयपीओ आता गुंतवणूकदारांसाठी खुले झालेत.

आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांची नावे सर्वात प्रमुख

नोव्हेंबर महिन्यातच देशातील 10 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ पूर्ण केलेत. आता डिसेंबरमध्ये ज्या कंपन्या त्यांचा IPO आणू शकतात, त्यामध्ये ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी आणि आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांची नावे सर्वात प्रमुख आहेत. आनंद राठी वेल्थ लिमिटेड हा मुंबईस्थित आर्थिक समूह आनंद राठीचा एक भाग आहे.

‘या’ कंपन्या रांगेत आहेत

RateGain चा 1,335 कोटी रुपयांचा IPO 7 ते 9 डिसेंबरदरम्यान लोकांसाठी खुला असेल. दुसरीकडे आनंद राठी वेल्थचा IPO 2 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी IPO साठी तयारी केलीय. यामध्ये ग्लोबल हेल्थ लिमिटेड, जी मेदांता ब्रँड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालवते, फार्मसी रिटेल चेन मेड प्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि हेल्थियम मेडेट यांचा समावेश आहे. या कंपन्यांशिवाय मेट्रो ब्रँड, श्रीराम प्रॉपर्टीज, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, श्रीबजरंग पॉवर अँड इस्पात आणि व्हीएलसीसी हेल्थकेअर देखील त्यांचे आयपीओ आणू शकतात. या कंपन्यांची कागदपत्रे सध्या पुनरावलोकनाच्या टप्प्यात आहेत.

बाजाराला काय फायदा?

गुंतवणूक बँकर्सनी पीटीआयला सांगितले की, या सर्व कंपन्या डिसेंबर महिन्यात IPO द्वारे 10,000 कोटी रुपये उभारू शकतात. आयपीओच्या मदतीने कंपन्या निधी उभारतील आणि यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होईल. यापैकी काही IPO OFS अंतर्गत जारी केले जातील म्हणजेच ‘ऑफर फॉर सेल’ अंतर्गत उपलब्ध असतील. OFS च्या मदतीने खासगी इक्विटी कंपन्या किंवा प्रवर्तक त्यांचे होल्डिंग विकून रोख रक्कम जमा करू शकतात. LearnApp.com चे संस्थापक आणि CEO प्रतीक सिन्हा म्हणतात की, IPO येत असल्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये मोठी उडी दिसू शकते.

बुल मार्केटमधील कोणत्याही कंपनीसाठी सर्वोत्तम संधी

प्रतीक सिन्हा म्हणतात, “आयपीओ ही बुल मार्केटमधील कोणत्याही कंपनीसाठी सर्वोत्तम संधी आहे. यामुळेच प्रत्येक कंपनी अशा वेळी IPO आणण्याची वाट पाहत असते, जेव्हा बाजारात शेअरचे भाव जास्त असतात. कंपन्यांना बाजारातील लोकांच्या उत्साहाचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यात त्यांना यशही मिळते. सध्या IPO मध्ये गुंतवणूकदारांकडून भरपूर अर्ज प्राप्त होत आहेत आणि IPO ची सदस्यता अनेक पटींनी वाढत आहे. यामुळे कंपन्या IPO च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उभारत आहेत.

ट्रेंड चालू राहणार

आगामी काळात हा ट्रेंड कायम राहणार असल्याचे प्रतीक सिन्हा सांगतात. या काळात अनेक टेक कंपन्या IPO आणतील. बाजार शांत होईपर्यंत किंवा थांबेपर्यंत हा ट्रेंड चालू राहील. या वर्षावर नजर टाकली तर जवळपास 51 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणलेत. यातून एक लाख कोटी रुपये उभे राहण्याची शक्यता आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, दुसरीकडे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा InvIT, ज्याला Power Grid InvIT म्हणून ओळखले जाते, त्याच्या IPO मधून 7,735 कोटी रुपये उभे केलेत. त्याचप्रमाणे ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने सुरुवातीच्या शेअर विक्रीद्वारे 3,800 कोटी रुपये उभे केलेत.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पुढील आठवड्यात ‘या’ दोन दिवशी तुमच्या बँकेत संप असेल, तारीख लक्षात ठेवा

पेन्शनर्स आता मोबाईल अॅपवरून हयातीचा दाखला सादर करू शकणार, कसे आणि काय करायचे?

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.