रशिया युक्रेन युद्ध: तेल आयातीसाठी ‘या’ देशाकडून भारताला आणखी एक ऑफर; वाढत्या किंमतीवर होईल परिणाम

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्याबाबत अनेक संकट निर्माण झाल्यानंतर आता इराणकडून भारताला तेल, गॅसचा व्यापार वाढीसंदर्भात एक ऑफर दिली आहे.

रशिया युक्रेन युद्ध: तेल आयातीसाठी 'या' देशाकडून भारताला आणखी एक ऑफर; वाढत्या किंमतीवर होईल परिणाम
crude Oil Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 5:13 PM

नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे तेल आणि गॅस (Petrol and Gas) पुरवठ्याबाबत अनेक संकट निर्माण झाल्यानंतर आता इराणकडून भारताला तेल, गॅसचा व्यापार वाढीसंदर्भात एक ऑफर (Offer) दिली आहे. यासंदर्भात भारतातील इराणच्या दूतावासाने म्हटले आहे की, इराणने तेल आणि वायू निर्यातीसाठी रुपया-रियाल व्यापार पुन्हा सुरू करून भारतातील व्यापाराच्यी गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची ऑफर देण्यात आली आहे.

याआधीही भारताला रशियन कंपन्यांकडून भारताला मोठ्या सवलतींच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली होती. या दोन्ही देशांनी रुपया-रियाल व्यापार पुन्हा सुरू केल्यास द्विपक्षीय व्यापार 30 अब्जपर्यंत पोहचण्याची शक्यता इराणच्या राजदूताकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणवर मर्यादा

यापूर्वी इराण हा भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार होता, परंतु अमेरिकेकडून इराणमधून तेल निर्यातीवर निर्बंध घातल्यानंतर भारताला इराणमधून आयात बंद करावी लागली. एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरने जाहीर केलेल्या इराणच्या राजदूतानी स्पष्ट केले आहे की, तेल आणि वायू निर्यातीसाठी रुपया-रियाल व्यापार सुरू करण्यासाठी भारताच्या ऊर्जाबाबत गरजा पूर्ण करण्यासाठी इराण केव्हाही तयार आहे. याबाबत ते पुढे म्हणाले की रुपया-रियाल व्यापार प्रणाली दोन्ही देशांच्या कंपन्यांना एकमेकांशी थेट व्यवसाय करण्यासाठी मदत करू शकते आणि लवादाचा खर्चही टाळू शकते.

व्यापाराची समजूतदार प्रणाली

विशेष बाब याआधी म्हणजे भारत आणि इराण यांच्यामध्ये एक आदानप्रदान व्यापाराची एक समजूतदार प्रणाली होती. ज्या ठिकाणी भारतीय तेल कंपन्या स्थानिक इराणी बँकेला रुपयामध्ये पैसे देत होत्या आणि हा पैसा भारतातून इराण आयात करुन वापरत होता. त्यामुळेच त्यामध्ये डॉलरच्या चढउताराचा कोणताही परिणाम झाला नाही. या व्यवहारामुळे सौदी अरेबियाला मागे टाकून इराण भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून गणला गेला होता.

भारतासाठी इराण इच्छूक

त्यानंतर अमेरिकेकडून पुन्हा निर्बंध लादले गेल्यानंतर, भारत-इराण व्यापार FY19 मधील 17 अब्ज वरून चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारीमध्ये 2 बिलियनपेक्षा कमी झाला. त्यामुळेच याबाबत इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, तेहरान देखील थांबलेल्या इराण-पाकिस्तान-भारत पाइपलाइन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि भारतात नैसर्गिक वायू वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्गासंदर्भातही काम करण्यासाठी इराण इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियाकडूनही सवलतीच्या दरात क्रूड

इराणच्या आधीही रशियाने भारताला कच्चा तेलाचा पुरवठा वाढवण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे भारतीय कंपन्यांनीही क्रूडची खरेदी केले. या आठवड्याच्या प्रारंभीच देशातील सर्वात मोठी तेल रिफायनर आणि विपणन कंपनी इंडियन ऑइलने 3 दशलक्ष बॅरल रशियन क्रूडसाठी करार केला होता आणि दुसर्‍या क्रमांकाच्या BPCL ने मोठ्या सवलतीच्या दरात 2 दशलक्ष बॅरल बुक केले होते.

तेल पुरवठ्यात रशिया बलाढ्य

याआधीही माध्यमांच्या अहवालानुसार रशिया भारताला 25 टक्क्यांपर्यंत सूट देत असल्याचे म्हटले होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 93 डॉलरवरून प्रति बॅरल 140 डॉलर झाला होता. त्यामुळे त्यानंतर क्रूड तेलाच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून आली. भारताकडून या तेल आणि गॅस पुरवठ्याबाबत गरजा भागवण्यासाठी 85 टक्के तेल हे बाहेरून खरेदी करतो. तेल पुरवठा करण्यामध्ये रशिया हा दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो जागतिक पातळीवर 14 टक्के पुरवठा करतो.

संबंधित बातम्या

सावधान! Income Tax वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल तर पकडले जाल; आयकर अधिकारी ‘असा’ घेणार शोध

US Federal reserves च्या व्याज दरवाढीचा भारताला फायदा; रुपयाच्या मुल्यात सुधारणा

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.