Inflation : आता याला दिलासा म्हणणार का? रेपो रेट जैसे थे, पेट्रोल-डिझेल स्वस्त नाही, महागाई तर डोक्यावर

Inflation : रेपो दर जैसे थे ठेवल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात खरंच मोठा फरक पडणार आहे का? महागाई कमी होणार आहे का? स्वस्ताई येईल का..

Inflation : आता याला दिलासा म्हणणार का? रेपो रेट जैसे थे, पेट्रोल-डिझेल स्वस्त नाही, महागाई तर डोक्यावर
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:41 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (RBI MPC) आढावा घेतल्यानंतर दुसऱ्यांदा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी वर्षभरात समितीने 6 वेळा रेपो दरात वाढ केली होती. ईएमआयचा हप्ता वाढल्याने महागाईशी दोन हात करणाऱ्या चाकरमानी त्यामुळे मेटाकुटीला आला होता. रेपो दर न वाढल्याने हप्ता वाढणार नसला तरी त्याला कसलाच दिलासा मिळणार नाही. पुढील तीन महिने ईएमआयचा (EMI) वाढलेला हप्ता भरण्याचे समाधान तेवढे त्याच्या गाठीशी असेल. बाकी पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थ, गव्हाचे, डाळींचे भाव वाढलेलेच आहेत. एकूण काय सर्वसामान्यांना अजूनही स्वस्ताईच्या गाजरावर पुढील दिवस चटके सहन करावे लागतील हे नक्कीच

मध्यमवर्गाची ससेहोलपट श्रीमंत वर्गाला या गणिताशी काहीही देणे घेणे नाही. खरा बोजा पडतो तो केवळ मध्यमवर्गीयांवर. त्याला बँकेच्या कर्जाची चिंता सतावते, मुलांच्या शाळेचा वाढलेला खर्च पेलवायचा असतो. घराच्या किरणा सामानाची यादी त्याची वाट पाहत असते. या कुरुक्षेत्रात तो एकटाच अभिमन्यू संकटांनी घेरलेल आहे. गरिबांची तर महागाईने अत्यंत बिकट अवस्था केलेली आहे. कोविडनंतरच्या तीन वर्षांत या परिस्थितीत बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेल स्वस्ताई कधी दैनिक भास्करने केंद्र सरकारच्या धोरणांचा आढावा घेत, सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाने जबरदस्त उसळी घेतली होती. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. नंतर त्यात घसरण झाली. पण पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई आली नाही.

हे सुद्धा वाचा

कुठलाच बदल नाही कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या 13 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 22 मे 2022 रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरवर पोहचले. इंधन दर कपातीवेळी या कंपन्या अंग काढून घेतात.

असा बसला फटका गेल्या वर्षभरात ग्राहकांवर होमलोनचा भार सातत्याने वाढत आहे. त्यांच्यावर दोन प्रकारे दडपण आले आहे. काही बँकांनी प्रत्येक महिन्याच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल केला नाही. बँकांनी कर्जाचा कालावधी वाढविला आहे. बँकांनी कर्जावरील व्याज वाढविले. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा ईएमआयवरील 1000 रुपये वाढतील. याचा अर्थ तुम्हाला 180 महिने ईएमआय आणखी चुकता करावा लागेल. हा कालावधी पुढे 5 ते 6 वर्षांकरीता वाढेल.

असा वाढला रेपो रेट भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.