AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAN-AADHAR LINK : तुमचा पॅन आधारशी लिंक झाला की नाही? असे चेक करा स्टेटस

पण मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status)

PAN-AADHAR LINK : तुमचा पॅन आधारशी लिंक झाला की नाही? असे चेक करा स्टेटस
तुमचा पॅन आधारशी लिंक झाला की नाही? असे चेक करा स्टेटस
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 4:36 PM

नवी दिल्ली : पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आज म्हणजे 31 मार्चपर्यंत आहे. पूर्वी ही तारीख मागील वर्षी फक्त 30 जूनपर्यंत होती. कोरोना साथीच्या आजारामुळे ती 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली. आपण मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. आपण आपले पॅन-आधार कार्ड लिंक केला असेल तर आपण जाणू इच्छित असाल आपला पॅन-आधार लिंक झाला की नाही. तर आम्ही येथे एक अतिशय सोपा मार्ग सांगत आहोत. यामुळे आपण पॅन आणि आधार कार्ड लिंकचा स्टेटस काय आहे हे चेक करु शकाल. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status)

अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक

यासाठी, आपल्याला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/AhaarPreloginStatus.html वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंकआधार स्टेटस वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल. जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता.

एसएमएसद्वारे करु शकता लिंक

जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा. ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status)

इतर बातम्या

मोठी बातमी! RBI ने ऑटो पेमेंटची सुविधा थेट 6 महिन्यांसाठी वाढविली

लाईव्ह व्हिडीओत टॉर्चर, कुणावर बलात्कार, तर कुणाची तरी हत्या, फेमस होण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी काहीही धिंगाणा

नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.