ईशा अंबानीची कमाल, डीमार्टसह बड्या कंपन्यांना मागे टाकत रिलायन्स रिटेलला बनवले अव्वल
Isha Ambani Director of Reliance Retail: रिलायन्स रिटेलचे मूल्यांकन 110 अब्ज डॉलर्स म्हणजेच 9 लाख कोटी रुपयांच्यावर आहे. जे ITC आणि HUL सारख्या मोठ्या कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. सध्या ITC चे मार्केट कॅप 5.49 लाख कोटी रुपये आहे. HUL चे मूल्यांकन 5.25 लाख कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची जबाबदारी सांभाळात आहे. त्यांनी रिलयान्स रिटेलमध्ये कमाल करुन दाखवली आहे. त्यांनी अनेक बड्या कंपन्यांना मागे टाकत विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या बड्या कंपन्यांमध्ये डीमार्ट (Dmart), आयटीसी (ITC), ब्रिटानिया (Britannia), टाटा कंझ्युमर (Tata Consumer ), गोदरेज कंझ्युमर (Godrej Consumer), एचयुएल (HUL), नेस्टले (Nestle) यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये रिलायन्स रिटेलची एकूण विक्री 3 लाख कोटी रुपये होती. हा आकडा देशातील टॉप 7 ग्राहक कंपन्यांपेक्षा जास्त आहे. विशेष बाब म्हणजे हा आकडा एव्हेन्यू सुपरमार्टच्या (डीमार्ट) विक्रीच्या आकारापेक्षा 5 पट जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तीन तिमाहीत रिलायन्सची 56,983 कोटी रुपयांची विक्री केली होती.
सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकले
ब्रोकरेज कंपन्यांनी रिलायन्स रिटेलचे व्हॅल्यूयशन (मूल्यांकन) आधीच गगनाला भिडले आहे. रिलायन्स रिटेलचे मूल्यांकन 110 अब्ज डॉलर्स म्हणजेच 9 लाख कोटी रुपयांच्यावर आहे. जे ITC आणि HUL सारख्या मोठ्या कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. सध्या ITC चे मार्केट कॅप 5.49 लाख कोटी रुपये आहे. HUL चे मूल्यांकन 5.25 लाख कोटी रुपये आहे. एव्हेन्यू सुपरमार्टचे मूल्य 2.99 लाख कोटी रुपये आहे. नेस्ले इंडियाचे मार्केट कॅप 2.39 लाख कोटी रुपये आहे. तर गोदरेज कंझ्युमर, ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे.
मूल्यांकनावर तज्ज्ञांचा युक्तिवाद
रिलायन्स रिटेलच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ICICI सिक्युरिटीजने कंपनीचे मूल्यांकन 9 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्षातील विक्री तिप्पट आहे. या मूल्यांकनानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण कर्ज 2.3 लाख कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, रिलायन्स रिटेलच्या एकूण कर्जाबाबत कोणतीही अचूक माहिती देण्यात आलेली नाही. त्यानुसार, ब्रोकरेजने रिलायन्स रिटेलच्या शेअरची किंमत 1,332 रुपये प्रति शेअर अंदाजित केली आहे.