इशा अंबानीने 500 कोटींना विकला तिचा हा बंगला, पाहा कोणी घेतला
मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिने तिचा बंगला ५०० कोटीहून अधिक रुपयांना विकला आहे. हा अलिशान बंगला अनेक सुख-सुविधांनी सज्ज आहे. या बंगल्यात एकूण १२ खोल्या आहेत. सोबत जीम, स्पा या सारख्या गोष्टी देखील आहे. तिचा हा बंगला कोणी खरेदी केलाय जाणून घ्या.
Isha Ambani : उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या तिच्या बंगल्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी त्यांचा लॉस एंजेलिसमधला बंगला विकला आहे. अमेरिकेतील हा आलिशान बंगला हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ यांनी घेतला आहे. ईशा आणि आनंद पिरामल यांनी जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांना हा बंगला 500 कोटींहून अधिक रुपयांना विकल्याचं समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या बंगल्यात अनेक सुख सुविधा आहेत. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. जेनिफर लोपेझ यांनी त्यांचा हा आलिशान बंगला खरेदी केल्याने सध्या त्याची चर्चा आहे. या बंगल्यात जिम, स्पा, सलून आणि इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आणि बऱ्याच गोष्टी आहेत. 38,000 चौरस फूट क्षेत्रफळात हा बंगला पसरला आहे. या बंगल्यात 12 बेडरूम आणि 24 बाथरूम आहेत.
जेनिफर लोपेझने 2022 मध्ये बेन ऍफ्लेकसोबत चौथे लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेझ हिच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. तिच्याकडे असलेल्या संपत्तीची किंमत जवळपास 3332 कोटी रुपये आहे.. जेनिफरने डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. तिचा भारतात आणि जगभरात मोठा चाहता वर्ग आहे.
महालापेक्षा कमी नाही हा बंगला
आनंद पिरामलच्या आई-वडिलांनी ईशा अंबानीला लग्नात मुंबईत सी-फेसिंग असलेला बंगला भेट म्हणून दिला होता. हा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. 3D डायमंड थीममध्ये हा बंगला डिझाइन केला आहे. गुलिता असं या बंगल्याचे नाव आहे. गुलिता बंगला दिसायला खूपच प्रेक्षणीय आहे. 50 हजार स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला बनवला आहे. त्याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे. या बंगल्यात तीन तळघर, जलतरण तलाव आणि उंच छतासह एक मोठा हॉल देखील आहे.