Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SHARE MARKET: घसरणीचं सत्र संपल,सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला; अदानी ग्रुपची ब्लॉकब्लस्टर डील!

आजच्या व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स मध्ये 180 अंकांची तेजी नोंदविली गेली. निफ्टी 15850 च्या टप्प्यापर्यंत पोहोचला. आज (सोमवार) सेन्सेक्स 180 अंकांच्या तेजीसह 52,973.84 स्तरावर बंद झाला.

SHARE MARKET: घसरणीचं सत्र संपल,सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला; अदानी ग्रुपची ब्लॉकब्लस्टर डील!
शेअर बाजारImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 7:43 PM

नवी दिल्ली- देशांतर्गत शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) तेजी-घसरणीचं वातावरण दिसून आलं. आजच्या व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स मध्ये 180 अंकांची तेजी नोंदविली गेली. निफ्टी 15850 च्या टप्प्यापर्यंत पोहोचला. आज (सोमवार) सेन्सेक्स 180 अंकांच्या तेजीसह 52,973.84 स्तरावर बंद झाला. निफ्टी 60 अंकांच्या वाढीसह 5842 स्तरावर पोहोचला. आजच्या व्यवहारादरम्यान ऑटो, बँक आणि मेटल शेअर्समध्ये (BANK AND METAL SHARES) सर्वाधिक खरेदी दिसून आली. निफ्टी वर ऑटो निर्देशांक 2.5 टक्के वाढ दिसून आली. बँक आणि फायनान्शियल्स इंडेक्स 1.5 टक्के तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स वर 30 पैकी19 शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. आजच्या सर्वाधिक वधारणीच्या शेअर्समध्ये एनटीपीसी NTPC, बजाज फायनान्स BAJFINANCE, एसबीआयएन SBIN, मारुती MARUTI, एचडीएफसी HDFC, कोटकबँक KOTAKBANK यांचा समावेश होतो.

अदानी ग्रूपची ब्लॉकब्लस्टर डील

अदानी ग्रुपने सिमेंट व्यवहार क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. अदानी ग्रूपने जगातील आघाडीची सिमेंट कंपनी होल्सिम ग्रुपच्या अधिग्रहणाचा व्यवहार करार पूर्ण केला आहे. अदानी ग्रूपने भारतातील सर्वात मोठ्या दोन सिमेंट कंपन्या अंबुजा सिमेंट Ambuja Cement आणि एसीसी ACC मधील होल्सिम ग्रुपची संपूर्ण भागीदारी 10.5 अरब डॉलरला (80,800 करोड़ रुपये) खरेदी करण्याच्या व्यावसायिक कराराला अंतिम स्वरुप दिलं आहे. अदानी ग्रूपद्वारे पूर्णत्वास गेलंलं आजवरचं सर्वात मोठं अधिग्रहण मानलं जातं.

SBI शेअर्समध्ये तेजी

SBI शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली. शेअर अंदाजित 3 टक्क्यांच्या तेजीसह 457 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. गेल्या आठवड्याच्या अखरेच्या दिवशी ( शुक्रवारी) 445 रुपयांवर बंद झाला होता. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या SBI द्वारे गेल्या आठवड्यात आर्थिक तिमाही अहवाल जारी केले होते. बँकेच्या नफ्यात वार्षिक 41 टक्के आणि NII 15.3 टक्के उंचावला होता.

घसरण संपली, तेजी सुरू

गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं होतं. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली.

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.