आता अडकली वादाच्या भोवऱ्यात, अशी झाली होती Everest कंपनीची सुरुवात
Everest Masala : सध्या भारतीय मसाला व्यापारातील काही कंपन्यांच्या व्यवसायावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. एव्हरेस्ट या कंपनीच्या उत्पादनावर हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या देशांनी बंदी घातली आहे. पण एव्हरेस्ट सुरुवात कशी झाली ते तुम्हाला माहिती आहे का?
आज मसाला कंपन्यांमध्ये टॉप ब्रँड म्हणून एव्हरेस्ट (Everest Masala) गणल्या जातो. या कंपनीवर संशयाचे धुके पसरले आहे. तर जागतिक व्यवसायावर मोठे संकट आले आहे. एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनी बंदी घातली आहे. या कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये घातक कीटकनाशक एथिलीन ऑक्साईड सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. हे रसायन कँन्सर सारख्या गंभीर रोगांना आमंत्रण देत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आज एव्हरेस्टवर आरोपांचे ढग जमा झाले आहेत, पण कधीकाळी अगदी गल्लीतून या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला होता. एका छोट्या दुकानातून सुरु झालेला हा प्रवास कसा झाला कोट्यवधींचा ब्रँड?
वडिलांची होती छोटी दुकान
वाडीलाल शहा यांच्या वडिलांचे 200 चौरस फुटावर मसालाच्या दुकान होते. त्याच दुकानात वाडीलाल हे सुद्धा काम करत होते. त्याचवेळी मसाला पॅकेट बाजारात उतरविण्याची त्यांना कल्पना सुचली. सर्व मसाल्यांचे योग्य प्रमाण ठरवून त्याची चव बदलता कामा नये, या विचाराने ते पछाडले. त्यांनी या कल्पनेलाच एव्हरेस्ट असं नाव दिलं.
वडिलांच्या व्यवसाय सातासमुद्रापार
वाडीलाल यांनी 1967 मध्ये मसाला कंपनी तयार केली. तिचे नाव एव्हरेस्ट मसाले (Everest Spices) ठेवले. पण त्यांची स्वप्न मोठी होती. त्यांना एका छोट्या दुकानातून हा व्यवसाय साता समुद्रापार पोहचवायचा होता. सुरुवातीला त्यांना वितरक भेटत नव्हता. मग त्यांनी मसाला पॅकेट तयार केले आणि ते स्वतः अनेक शहरात त्याची विक्री करु लागले. हळूहळू व्यवसायाने बाळसे धरले आणि तो मोठा ब्रँड ठरला.
मुंबईत पहिला कारखाना
मसाल्याच्या शौकीन भारतीयांनी लागलीच हा ब्रँड उंचावला. मागणी वाढली. त्यामुळे वाडीलाल यांनी 1982 मध्ये मुंबईतील विक्रोळीत पहिली फॅक्टरी सुरु केली. त्यांनी डिलर्स आणि सप्लायर्सला कारखाना भेटीला बोलावले. कारखाना आणि उत्पादन विधी पाहून ते प्रभावित झाले आणि हा ब्रँड कोट्यवधींच्या मनात घर करुन गेला.
प्रत्येक वर्षी 370 कोटींहून अधिक पॅकेट्सची विक्री
वाडीलाल शाह यांच्या कष्टाला फळ मिळाले. मसाला पॅकेट्सची विक्री वाढली. जाहिरातीने रंगत वाढली. कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 2,500 कोटींहून अधिक झाला. एव्हरेस्टच्या दाव्यानुसार कंपनी वर्षभरात 370 कोटी पॅकेट्स मसाला विक्री करते. एव्हरेस्ट चहा, मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, सांभर मसाला अशा अनेक व्हेरायटी बाजारात विक्रीत होतात.