31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’; आयकर विभागाकडून जनजागृती
तुम्ही इनकम टॅक्स रिटन (ITR) भरला आहे का? नसेल भरला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स भरता येऊ शकतो. इनकम टॅक्स भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
नवी दिल्ली : तुम्ही इनकम टॅक्स रिटन (ITR) भरला आहे का? नसेल भरला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स भरता येऊ शकतो. इनकम टॅक्स भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इनकम टॅक्स भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पहाता आजच आपला टॅक्स भरा, आणि गर्दी टाळा असे आवाहन अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
तीन कोटींपेक्षा अधिक जणांनी दाखल केला आयटीआर
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2020-21 च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आपले इनकम टॅक्स रिटन दाखल केला आहे. दररोज चार लाखांपेक्षा अधिक दाते हे आपला इनकम टॅक्स भरत आहेत. दरम्यान ज्या दात्यांनी आतापर्यंत इनकम टॅक्स रिटन दाखल केला नाही, अशा दात्यांनी लवकरात -लवकर आपाला इनकम टॅक्स रिटन दाखल करावा असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
आयटीआर दाखल करण्याचे आवाहन
दरम्यान जास्तीत जास्त करदात्यांनी इनकम टॅक्स रिटन दाखल करावा यासाठी आता आयकर विभागाकडून देखील पुढाकार घेण्यात आला आहे. आयकर विभागाकडून करदात्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी करदात्यांच्या मोबाईलवर एसएमस पाठवणे, टीव्ही, वृत्तपत्रे अशा माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करणे, त्यातून कर भरण्याचे आवाहन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम
…तर तुम्ही अशा पद्धतीनं सोन्याच्या कर्जाची परतफेड करू शकता, RBI चा नियम काय सांगतो?
कॅनरा बँकेत मर्यादित कालावधीची ऑफर सुरू, 6.65% दराने गृहकर्ज, इतर बँकांचे दर काय?