यंदा आयकर भरताना असे करु नका, अन्यथा येईल आयकर विभागाची नोटीस

नवीन फॉर्म -16 अशा प्रकारे बनवला आहे की जे चुकीचे आणि बनावट कागदपत्रे ठेवतात त्यांना संगणक-आधारित प्रक्रियेद्वारे सहज ओळखता येईल.

यंदा आयकर भरताना असे करु नका, अन्यथा येईल आयकर विभागाची नोटीस
करदात्यांना दिलासा
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 12:00 PM

नवी दिल्ली : दरवर्षी तुम्ही आयकर विभागाचा आयटीआर भरत असणार. हा भरताना विविध कर बचतीचे पुरावे देत असणार. यंदा मात्र आयटीआर भरताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. आयकर वाचवण्यासाठी, काही जण घरभाडे पावती (House Rent Slip) देतात. काही जण अनेकदा बनावट घरभाडे पावती (Fake House Rent Slip) जोडतात, पण आता असे करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण आता ITR भरताना, बनावट घरभाडे पावती असल्यास आयकर विभाग थेट नोटीस (Income Tax Department)पाठवू शकतो. तुमची चौकशी होऊ शकते. एक लाखाच्या वार्षिक भाड्यासाठी घरमालकाचा पॅन तपशील देण्याची आवश्यकता नाही, आयटीआर भरताना करदाते याचा फायदा घेतात.

हे कराल तर अडचणीत याल

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये घरभाडे भत्ता (HRA) कर सवलतीत कोणताही बदल केला नाही. यामुळे 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये HRA कर सूट मोजण्यासाठी मागील वर्षी असणारी पद्धत सुरु राहणार आहे.

आयकर विभागाचे म्हणणे आहे की आयटीआर भरताना बनावट घरभाडे पावती देणे चुकीचे आहे. बनावट घरभाडे पावतीचे प्रकार थांबवण्यासाठी आयकर विभागाने एक योजना तयार केली आहे. आयटीआर भरताना बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.

बनावट घरभाडे पावत्या जोडतात

मनी9च्या अहवालानुसार, देशभरात मोठ्या संख्येने लोक आयकर टाळण्यासाठी बनावट घर भाड्याच्या स्लिप लावतात, ही बाब लक्षात घेऊन आयकर विभाग आता या प्रकाराला लगाम घालण्याच्या तयारीत आहे. आयकर विभाग नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे बनावट घरभाडे स्लिप टाकणाऱ्यांची ओळख पटवणे सोपे होणार आहे.आयकर विभाग या वर्षापासून कारवाई करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बनावट घर भाडे पावती जोडली तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तंत्रज्ञानाचा वापर

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, नवीन आयटीआर फॉर्म आणि आयकराचा सुधारित नवीन फॉर्म -16 अशा प्रकारे बनवला आहे की जे चुकीचे आणि बनावट कागदपत्रे ठेवतात त्यांना संगणक-आधारित प्रक्रियेद्वारे सहज ओळखता येईल. संगणकीय तपासणीदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा डेटा बरोबर आढळला नाही, तर आयकर विभागाकडून थेट नोटीस पाठवली जाऊ शकते. म्हणजेच बनावट भाडे स्लिप टाकणाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.

नवीन कॉलमचा समावेश

आयकर भरणाऱ्यांना नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये अतिरिक्त भत्त्याची माहिती भरावी लागेल. नवीन आयटीआर फॉर्ममध्ये एक ड्रॉप डाउन कॉलम देण्यात आला आहे, ज्यामध्ये करदाते अतिरिक्त भत्त्यांचा तपशील सहजपणे प्रविष्ट करू शकतील. एचआरए, एलटीए, पेन्शन रजा पगार यासारखे इतर भत्ते यापासून वेगळे राहतील.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.