ITR Form FY24 | रोखीत झाली कमाई? आयटीआर फॉर्ममध्ये द्यावी लागेल माहिती

ITR Form FY24 | आयकर विभागाने यावेळी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, तीन महिने अगोदरच आयटीआर अर्ज दिले आहेत. त्यामुळे करदात्यांना आता रिटर्न भरण्यासाठी 7 महिन्यांचा वेळ मिळणार आहे. हा नवीन पायंडा पडला आहे. त्याचा करदात्यांना मोठा फायदा होईल. अनेक प्रयोग सुरु आहेत. त्यात या प्रयोगाची भर पडली आहे.

ITR Form FY24 | रोखीत झाली कमाई? आयटीआर फॉर्ममध्ये द्यावी लागेल माहिती
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 9:21 AM

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : आयकर रिटर्न भरण्याचा कालावधी यंदा वेळेआधीच अधिकृतपणे सुरु होत आहे. प्राप्तिकर खात्याने आताच नवीन आयटीआर फॉर्म दिले आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यास अजून तीन महिन्यांचा अवकाश आहे. त्यापूर्वीच आयकर खात्याने आयटीआर फॉर्म करदात्यांना दिले. या आयटीआर फॉर्ममध्ये करदात्यांना रोखीत घेतलेली रक्कम आणि बँकिंगसंबंधीची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन आयकर रिटर्न फॉर्म त्या करदात्यांसाठी आहे, ज्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांच्या आत आहे. या फॉर्मध्ये योग्य आणि संबंधित माहिती भरणे आवश्यक आहे.

वेळेपूर्वीच आला आयटीआर फॉर्म

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शुक्रवारी संध्याकाळी उशीरा आर्थिक वर्ष 2023-24 ( मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी आयटीआर-1 आणि आयटीआर-4 फॉर्म समोर आणले. आतापर्यंत सीबीडीटी इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म आर्थिक वर्षांच्या अखेरच्या महिन्यात, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देते. पण यंदा सीबीडीटीने नवीन पायंडा पाडला. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच करदात्यांसाठी तीन महिने अगोदरच आयटीआर फॉर्म आणला. चालू आर्थिक वर्षात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तर तर यंदा करदात्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी 7 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

आयटीआर-1 आणि आयटीआर-4

आयटीआर-1 फॉर्म 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कमाई असणाऱ्या करदात्यांसाठी आहे. यामध्ये वेतन, जंगम, स्थावर मालमत्ता, इतर स्त्रोत, जसे की व्याज आणि 5 हजार रुपयांपर्यंतचे शेतीमधील उत्पन्न याविषयीची माहिती भरावी लागते. इतर माहितीविषयी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आयटीआर-4 मध्ये वैयक्तिक करदाता, अविभक्त हिंदू कुटुंब आणि एलएलपी व्यतिरिक्त इतर जण हा फॉर्म भरु शकता. यामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे. तर व्यवसाय वा संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी हा फॉर्म आहे.

आयटीआर-1 मध्ये हा बदल

ET च्या रिपोर्टनुसार, यावेळी करदात्यांना त्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल. जे संबंधित आर्थिक वर्षात वापरात होते. त्यात काही ना काही व्यवहार झाला असेल. तसेच या बँक खात्याशी संबंधित माहिती द्यावी लागेल. फॉर्ममध्ये अग्निवीर तरुणांसाठी नियम 80 सीसीएच अंतर्गत कपातीसाठी स्वतंत्र रकाना देण्यात आला आहे.

आयटीआर-4 मध्ये हा बदल

आयटीआर-4 फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहे. नवीन अपडेटेट इनकम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये करदात्यांना त्यांना रोखीतून कोठून कोठून रक्कम मिळाली याची माहिती द्यावी लागेल. त्यासाठी आयटीआर-4 फॉर्ममध्ये रिसीप्ट्स इन कॅश हा नवीन रकाना देण्यात आला आहे. यामुळे करदाता यासंबंधीची माहिती खासकरुन भरु शकेल. यापूर्वी क्रिप्टोकरन्सीसाठी खास रकाना जोडण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.