15 लाख गुंतवणुकीतून 7 कोटींचा नफा, स्वातंत्र्यापूर्वी टाटांची जगाला आश्चर्यचकीत करणारी केली होती कामगिरी

jamshedji tata and tata group success story: एम्प्रेस मिल भारतामधील पहिली कंपनी होती ज्याने कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यास सुरुवात केली. 1895 मध्ये कंपनीने अपघाती विमा सुरु केला आणि 1901 मध्ये प्रोव्हिडेंट फंड सुरु केला.

15 लाख गुंतवणुकीतून 7 कोटींचा नफा, स्वातंत्र्यापूर्वी टाटांची जगाला आश्चर्यचकीत करणारी केली होती कामगिरी
jamshedji tata and Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 11:24 AM

Tata group success story: टाटा उद्योग समूह देशातील सर्वात मोठा उद्योग समूह झाला आहे. टाटा यांनी उभारलेल्या उद्योगाचा विस्तार देशात नव्हे तर विदेशातही झाला आहे. 1870 मध्ये त्यांनी टाटा ग्रुपचे काम सुरु केले होते. त्यांच्याकडे सुरुवातीला एक एम्प्रेस मिल होती, जी 1874 मध्ये सुरू झाली. एम्प्रेस मिलचे पूर्ण नाव विव्हिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड होते. त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी ती मिल होती. गोपालकृष्णन आणि हरीश भट्ट यांनी लिहिलेल्या ‘जमशेदजी टाटा: पावरफुल लर्निंग्स फॉर कॉरपोरेट सक्सेज’ पुस्तकात कंपनीची यशोगाथा दिली आहे.

सात कोटी नफा मिळला अन् वाटलासुद्धा

जमशेदजी यांनी जेव्हा एम्प्रेस मिल सुरु केली तेव्हा सुरुवातीच्या काळात सर्व निर्णय तेच घेत होते. अगदी कर्मचारी नियुक्तीपासून ते मशीनपर्यंतचे निर्णय त्यांचे होते. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यासाठी 15 लाख रुपये गुंतवणूक केली होती. ती त्या काळात खूप मोठी रक्कम होती. 1913 पर्यंत या कंपनीचे गुंतवणुकीच्या तुलनेत 30 पट वाढले. जून 1920 मध्ये एम्प्रेस मिलचा नफा 7 कोटी रुपयांपर्यंत पोहचला.

कंपनीने ज्याप्रकारे नफा कमावला, त्याचप्रमाणे त्याचे वाटपही केले. जमशेदजी टाटा यांनी गुंतवणूकदारांमध्ये नफा वाटून घेतला. त्यांनी प्रत्येक वर्षी भागधारकांना 100% लाभांश देण्याचे ठरवले होते. परंतु 1920 मध्ये जेव्हा कमाईचा विक्रम मोडला गेला तेव्हा त्यांनी भागधारकांना 160% लाभांश दिला, हा त्यांचा स्वतःच एक विक्रम होता.

हे सुद्धा वाचा

निवृत्तीवेतन सुरु करणारी पहिली कंपनी

आर. गोपालकृष्णन आणि हरीश भट्ट यांनी पुस्तकात लिहिले आहे की, एम्प्रेस मिल भारतामधील पहिली कंपनी होती ज्याने कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यास सुरुवात केली. 1895 मध्ये कंपनीने अपघाती विमा सुरु केला आणि 1901 मध्ये प्रोव्हिडेंट फंड सुरु केला. त्या काळात भारतात हे सर्व काही नवीन होते. जमशेदजी टाटा यांना या योजनांसाठी कंपनीच्या नफ्यातून पैसे खर्च करावे लागले. परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. जमशेटजी टाटा अनेकदा म्हणायचे की कर्मचाऱ्यांचे कल्याण ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्या काळात एम्प्रेस मिलमध्ये नोकरी करणे हे लोकांचे स्वप्न होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.