कंपनीने 800 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कर्मचारी संघटना NITES ने कामगार आयुक्तांकडे याविरोधात तक्रार केली असून, कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संघटित क्षेत्रात सध्या मोठी रोजगारनिर्मिती सुरु आहे.
विशेष म्हणजे इंजिनीअरिंगबरोबरच एमबीएचं शिक्षण घेतलेल्या पुण्यातील तरुणांनाही लवकरच चांगले दिवस येणार आहे.
ठाकरे सरकारचा 15 बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार - ठाकरे सरकारनं 2 नोव्हेंबर 2020 रोजी 15 बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला. महत्त्वाचे म्हणजे त्या कंपन्या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
अंदाजे 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक येणार असून, जवळपास 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडीमध्ये यातील 8 कंपन्या येणार आहेत.
पुण्यात उद्योगांसाठी पूरक कौशल्ये देणारी शिक्षण व्यवस्था - पुण्यात येणाऱ्या उद्योगांसाठी पूरक कौशल्ये देणार शिक्षण व्यवस्था पुण्यात असल्याचा फायदा उद्योगांना आणि रोजगारालाही होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्यये असलेल्या इंजिनीअरिंगच्या 27 कॉलेजमधून दरवर्षी जवळपास 50 हजार विद्यार्थी बाहेर पडतात. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणाऱ्या सुमारे 40 संस्था पुण्यात असून, 14 विद्यापीठे आहेत.
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी काही बदल करावे लागू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.