AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो बायडन जिंकले आणि भारतात गुंतवणूकदार मालामाल; दिवसाअखेर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा रेकॉर्ड

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी भारतीय शेअर बाजार आज चांगलाच वधारल्याचे दिसले. आज दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार (BSE) 704 अंकांच्या तेजीसह 42,597 अंकावर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 197 अंकांच्या उसळीसह 12461 अंकावर स्थिरावला.

जो बायडन जिंकले आणि भारतात गुंतवणूकदार मालामाल; दिवसाअखेर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 7:21 PM

मुंबई : अमेरिकेतील निवडणुकीचा भारतीय शेअर बाजारावर चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळतोय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारल्याचे समोर आले आहे. आज दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार (BSE) 704 अंकांच्या तेजीसह 42,597 अंकावर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 197 अंकांच्या उसळीसह 12461 अंकावर स्थिरावला. (Joe Biden wins in US Sensex Nifty new record at the end of the day)

मागील 10 महिन्यांच्या तुलनेत निर्देशांक सर्वोच्च शिखरावर

आज दिवसाअखेर भारतीय शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजार मागील 10 महिन्यांच्या तुलनेत सोमवारी सर्वोच्च स्तरावर गेल्याची नोंद करण्यात आली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय. निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात मागील 6 दिवसांपासून तेजी नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारातील ही तेजी आणखी काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.

या शेअर्समध्ये तेजी

सोमवारी चालू सत्रात इंडस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एक्सिस बँकेच्या समभागांत (shares) तेजी बघायला मिळाली. तर सिप्ला, अडानी पोर्ट्स, मारुती, आयटीसी आणि ग्रासीम इंडस्ट्रीज या कंपन्याचे शेअर्स पडल्याचे दिसून आले.

6 दिवसांत 8 लाख कोटींची कमाई

भारतीय शेअर बाजार 2 नोव्हेंबरपासून वधारलेला आहे. दरम्यान भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारमूल्य 8.3 लाख कोटी रुपये झाले आहे. 2 नोव्हेंबरला याच कंपन्यांचे बाजारमूल्य 1,57,18,574.96 कोटी रुपये होते. आज हीच किंमत 1,65,45,014 वर गेली आहे. आकडेवारी पाहता 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत समभागधारकांनी (shares) जवळपास 8.3 लाख कोटींची कमाई केली. आज बाजार सुरू झाल्यापासूनच भारतीय शेअर बाजारात तेजी नोंदवली गेली. सकाळच्या सत्रात शेअर बाजार 42566.34 वर तर निफ्टी 12,451.80 वर पोहोचला. दिवसभरात बँक आणि फायनान्स कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या :

मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, गुंतवणूकदारांना 1 लाख कोटींहून जास्तीचा फायदा

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका

सेन्सेक्सची इतिहासातील सर्वात मोठी घसरण, कोरोनाचा मुंबई शेअर बाजारात कहर

(Joe Biden wins in US Sensex Nifty new record at the end of the day)