Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali ची खरेदी करताना या टीप्स लक्षात ठेवा, खिशावर ताण येणारच नाही

Diwali 2023 offers and shopping : दिवाळीची शॉपिंग जर व्यवस्थित नियोजन करुन करायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ज्यामुळे तुम्ही याचे योग्य नियोजन करु शकता. कोणत्या आहेत त्या शॉपिंग टीप्स जाणून घ्या.

Diwali ची खरेदी करताना या टीप्स लक्षात ठेवा, खिशावर ताण येणारच नाही
Diwali-Shopping
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 12:51 PM

Diwali 2023 : दिवाळी जवळ आली की सर्व बाजारपेठा उजळून निघतात. खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. यंदाही दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहेत. तुम्ही देखील दिवाळीची शॉपिंग करण्याचा प्लान केला आहे. तर घाईघाईत शॉपिंग करण्याऐवजी प्लान करुन शॉपिंग करा. तुमचे बजेट आणि खिसा लक्षात घेऊनच खरेदी करा. जेणेकरून नंतर तुम्हाला आर्थिक ताण येणार नाही.

1. यादी बनवा आणि बजेट ठरवा

सर्वातआधी तुम्हाला काय खरेदी करायची आहे याची यादी बनवून घ्या. त्यानंतर त्याचं बजेट किती असावे हे देखील ठरवून घ्या. यामुळे तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळू शकता.

2. इतर खर्च काय आहेत त्याची यादी करा?

या महिन्यात तुम्हाला इतर कोणते खर्च आहेत त्याची देखील यादी करुन घ्या. त्यानुसार योजना आणली तर तुम्हाला पैशांची अडचण येणार नाही.

3. क्रेडिट कार्ड कसे वापरावे?

तुम्ही जर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्याची योजना करत असाल तर त्यांचा विचारपूर्वक वापर करा. शेवटच्या क्षणी घाईघाईने खरेदी करू नका. ज्यामुळे तुमच्या खिशावर ताण येईल. क्रेडिट कार्ड वापरणे अनेकजण टाळण्याचा सल्ला देतात. क्रेडिट कार्डमधून खरेदी केली तर किती लवकर त्याची परतफेड करू शकता याची योजना बनवा.

4. EMI चा अवलंब?

तुम्हाला जर अत्यावश्यक वस्तूची खरेदी करायची असेल तर तुम्ही ईएमआयचा पर्याय निवडू शकता. एकदाच मोठा खर्च होण्यापेक्षा तो EMI मध्ये वाटला जाईल.

5. No Cost EMIs आणि Festive Offers

खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला चांगल्या सवलती आणि ऑफर कुठे मिळत आहेत हे आधीच तपासून घ्या. बर्‍याच प्लॅटफॉर्मवर नो कॉस्ट ईएमआय देखील ऑफर केले जातात. याची तुम्ही लाभ घेऊ शकता.