Diwali 2023 : दिवाळी जवळ आली की सर्व बाजारपेठा उजळून निघतात. खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. यंदाही दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहेत. तुम्ही देखील दिवाळीची शॉपिंग करण्याचा प्लान केला आहे. तर घाईघाईत शॉपिंग करण्याऐवजी प्लान करुन शॉपिंग करा. तुमचे बजेट आणि खिसा लक्षात घेऊनच खरेदी करा. जेणेकरून नंतर तुम्हाला आर्थिक ताण येणार नाही.
सर्वातआधी तुम्हाला काय खरेदी करायची आहे याची यादी बनवून घ्या. त्यानंतर त्याचं बजेट किती असावे हे देखील ठरवून घ्या. यामुळे तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळू शकता.
या महिन्यात तुम्हाला इतर कोणते खर्च आहेत त्याची देखील यादी करुन घ्या. त्यानुसार योजना आणली तर तुम्हाला पैशांची अडचण येणार नाही.
तुम्ही जर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्याची योजना करत असाल तर त्यांचा विचारपूर्वक वापर करा. शेवटच्या क्षणी घाईघाईने खरेदी करू नका. ज्यामुळे तुमच्या खिशावर ताण येईल. क्रेडिट कार्ड वापरणे अनेकजण टाळण्याचा सल्ला देतात. क्रेडिट कार्डमधून खरेदी केली तर किती लवकर त्याची परतफेड करू शकता याची योजना बनवा.
तुम्हाला जर अत्यावश्यक वस्तूची खरेदी करायची असेल तर तुम्ही ईएमआयचा पर्याय निवडू शकता. एकदाच मोठा खर्च होण्यापेक्षा तो EMI मध्ये वाटला जाईल.
खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला चांगल्या सवलती आणि ऑफर कुठे मिळत आहेत हे आधीच तपासून घ्या. बर्याच प्लॅटफॉर्मवर नो कॉस्ट ईएमआय देखील ऑफर केले जातात. याची तुम्ही लाभ घेऊ शकता.