नीता अंबानी यांना साडी नेसवून देण्यासाठी लाखोंचा चार्ज; कोण आहे डॉली जैन?

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे जामनगरमध्ये पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनसाठी विदेशातूनही पाहुणे पोहचले. प्री वेडिंग फंक्शनची जय्यत तयारी ही गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. हेच नाही तर आता या फॅक्शनमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नीता अंबानी यांना साडी नेसवून देण्यासाठी लाखोंचा चार्ज; कोण आहे डॉली जैन?
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 12:45 PM

मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी हा चर्चेत आहे. अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन तीन दिवस गुजरातमधील जामनगरमध्ये येथे सुरू होते. या प्री वेडिंग फंक्शनला विदेशातूनही खास पाहुणे हे दाखल झाले. जय्यत तयारी काही महिन्यांपासून सुरू होती. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हेच नाही तर या प्री वेडिंग फंक्शनमध्ये जवळपास बाॅलिवूडचे सर्वच कलाकार हे पोहचले. पहिल्यांदाच तीन खान खास डान्स करताना देखील अंबानींच्या पार्टीत दिसले. धमाकेदार व्हिडीओ या पार्टीतील व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे या पार्टीमध्ये खास लूकमध्ये नीता अंबानी या देखील दिसल्या. कॉकटेल पार्टीमध्ये नीता अंबानी, श्लोका अंबानी, ईशा आणि राधिका मर्चंट यांनी इंडियन लुक कॅरी केला. यावेळी नीता अंबानींच्या लूककडे सर्वांच्या नजरा दिसल्या. विशेष म्हणजे इंडियन लूकसाठी सेलिब्रिटींची पहिली पसंत ही कायमच डॉली जैन ही असते. डॉली जैन हिचे स्पेशल इंडियन लूकसाठी मोठे नाव आहे.

अनेकांना प्रश्न पडतो की, ही डॉली जैन नेमकी कोण आहे? डॉली जैन ही एक ड्रेप आर्टिस्ट आहे. डॉली जैनची खासियत म्हणजे तब्बल 325 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ती घालून देऊ शकते. फक्त हेच नाही तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही डॉली जैनच्या नावाची नोंद आहे. कोट्यवधी संपत्तीची मालकीन डॉली जैन आहे.

डॉली जैन ही तिच्या एका सेशनसाठी 35 हजार ते 2 लाखांपर्यंतची फीस घेते. नीता आणि मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या लॉन्चच्या वेळी देखील नीता अंबानी यांना साडी ही डॉली जैन हिनेच नेसवून दिली होती. फक्त हेच नाही तर राधिका मर्चंटसाठी ड्रेपिंगही डॉली जैन हिनेच केले. यासाठी डॉली जैन ही मोठी फीस घेत असल्याचे देखील सांगितले जाते.

फक्त अंबानी कुटुंबच नाही तर डॉली जैन हिने आतापर्यंत दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांना देखील साड्या या नेसवून दिल्या आहेत. जास्त करून सेलिब्रेटी या डॉली जैन हिच्याकडूनच साड्या नेसवून घेत असल्याचे सांगितेल जाते. डॉली जैन ही अगदी कमी वेळामध्ये खास साडी नेसवून देत असल्याचे सांगितले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून डाॅली जैन हे काम करत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.