निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ‘एनपीएस’ ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये करण्यात येणारी गुंतवणूक निवृत्तीच्या दृष्टीकोणातून सर्वोत्तम मानण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेऊन जर आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत प्रदीर्घ काळासाठी गुंतवणुक केल्यास, निवृत्तीनंतर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो.
नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये करण्यात येणारी गुंतवणूक निवृत्तीच्या दृष्टीकोणातून सर्वोत्तम मानण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेऊन जर आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत प्रदीर्घ काळासाठी गुंतवणुक केल्यास, निवृत्तीनंतर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. निवृत्तीनंतर एक मोठी रक्कम आपल्या हातात असल्याने आपण निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगू शकतो. राष्ट्रीय पेन्श योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ही योजना नेमकी काय आहे? त्याचा फायदा कसा होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कोणाला करता येते गुंतवणूक?
केंद्र सरकारकडून 2004 साली ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादीत असलेली ही योजना, 2009 साली सर्वांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमध्ये तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षानंतर कधीही गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. दर महिन्याला एक ठरावीक रक्कम या योजनेमध्ये गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे फायद्याचे
या योजनेमध्ये तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराय तेवढा पुढे तुमचा फायदा होतो. समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी दर महिन्याला या योजनेत 1 हजार रुपये गुंतवण्यास सुरुवात केली, तर तो त्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत केवळ 3 लाख रुपयेच जमा करू शेकेल. या 3 लाखांच्या मोबदल्यामध्ये त्याला एकूण 13.37 लाखांचा फायदा होतो. यापैकी आठ लाख रुपये हे त्याला एकरकमी मिळतात, तर पुढे कायमस्वरूपी 2676 रुपये पेन्शन सुरू होते. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढा अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो.
आता मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार#AssetMonetisation #BSNL #BSNLMTNL #DIPAM #MTNL https://t.co/axBSbIVMIO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या
ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण; अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल
कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?