Aadhaar किंवा PAN कार्डवर चुकीचे नाव आहे? नाव दुरुस्त करण्याच्या सोप्या स्टेप्स

आधार किंवा पॅन कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्यास तुम्ही सोप्या पद्धतीने आपले नाव दुरुस्त करुन घेऊ शकता

Aadhaar किंवा PAN कार्डवर चुकीचे नाव आहे? नाव दुरुस्त करण्याच्या सोप्या स्टेप्स
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 7:28 PM

मुंबई : आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा पॅन कार्डसाठी (PAN Card) अर्ज करताना, काही कारणास्तव सिस्टीममध्ये चुकीचे नाव किंवा स्पेलिंग मिस्टेक झाल्याचा अनुभव अनेक जणांना आला असेल. त्यामुळे इतर व्यवहारात अनेक प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. मात्र त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सहज सोप्या पद्धतीने आपले नाव दुरुस्त करुन घेऊ शकता. (Know Easy Steps to correct Aadhaar Card or PAN Card Name change)

आधार नंबर (Aadhaar Number) म्हणजे ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून (UIDAI) जारी केलेला 12 आकडी नंबर असतो. आधार कार्डाचा (Aadhaar Card) उपयोग बँक, दूरसंचार कंपनी, सार्वजनिक वितरण प्रणाली, इनकम टॅक्स ओळख प्रमाणीकरणासाठी केला जातो. रहिवासी दाखला आणि ओळखपत्र म्हणूनही उपयुक्त असल्यामुळे आधार कार्ड अप-टू-डेट ठेवणं महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे, पर्मनंट अकाऊंट नंबर किंवा पॅन नंबर (PAN) ही 10 आकडी विशिष्ट ओळख संख्या आहे, जी आयुष्यभरासाठी तुमची महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. पॅन नंबर तुमच्या सर्व प्रकारच्या वित्तीय व्यवहारांचा हिशेब ठेवण्यासाठी आयकर प्राधिकरणाची मदत करतो. तुमच्या राहण्याच्या पत्त्यात बदल झाला, तरी पॅन कार्डवर प्रभाव पडत नाही. पॅन कार्डवर (PAN Card) तुमचे नाम, जन्म तारीख आणि फोटो असतो.

बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीचे नाव आधार कार्ड आणि पॅन कार्डवर वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले असते. मात्र त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण ही चूक दुरुस्त केली जाऊ शकते. आधार कार्ड आणि पॅन कार्डमध्ये आपले नाव बदलून घेण्याचे काही सोपे मार्ग आहेत.

आधार कार्डमध्ये आपले नाव बदलून कसे घ्यावे?

>> आधार नामांकन केंद्रावर जा >> आधार संशोधन फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा >> या फॉर्मसोबत तुम्हाला हवे तसे व्यवस्थित नाव असलेली कागदपत्रं जोडा >> 25 ते 30 रुपयांइतके माफक शुल्क ही माहिती अपडेट करण्यासाठी भरावे लागतात (रक्कम काही ठिकाणी वेगवेगळी असू शकते) >> या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचे नाव योग्य पद्धतीने बदलून मिळेल.

(Know Easy Steps to correct Aadhaar Card or PAN Card Name change)

पॅन कार्डमध्ये आपले नाव बदलून कसे घ्यावे?

>> नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड वेबसाइटवर जा >> ‘Correction in Existing PAN’ हा पर्याय निवडा >> श्रेणी प्रकार निवडा >> योग्य नावासोबत कागदपत्रं जोडा >> Submit ऑप्शन क्लिक करा >> तुम्हाला शुल्क भरावे लागेल, मात्र नेमक्या रकमेचा उल्लेख नाही >> अपडेट केलेले पॅन कार्ड अर्ज केल्यापासून 45 दिवसांच्या आत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.

संबंधित बातम्या :

डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार, कॅश काढताना द्यावी लागणार ‘ही’ माहिती

PM Kisan Scheme: 1 डिसेंबरपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(Know Easy Steps to correct Aadhaar Card or PAN Card Name change)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.