Credit Card वापरून शॉपिंग करताय, या गोष्टींचे भान ठेवा, अन्यथा…

Credit Card | क्रे़डिट कार्ड घेताना त्यावर वार्षिक शुल्क (Annual fee) घेतली जाते की नाही, हे तपासून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डसच्या प्रकारानुसार वार्षिक शुल्क आकारले जाते.

Credit Card वापरून शॉपिंग करताय, या गोष्टींचे भान ठेवा, अन्यथा...
क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 1:03 PM

मुंबई: सध्याच्या पिढीच्या लोकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड या प्लॅस्टिक मनीचा मोठ्याप्रमाणावर वापर होताना दिसतो. क्रेडिट कार्डामुळे हातात पैसे नसतानाही हवी तेव्हा खरेदी करता येते. याशिवाय, क्रेडिट कार्डसच्या वापरावर मिळणारी डिस्काऊंट आणि कॅशबॅक अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. (Know about Credit Card use and charges)

मात्र, क्रेडिट कार्डवरुन बिनधास्त शॉपिंग करताना काही गोष्टींचे भान बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना अनेकदा त्यावरील हिडन चार्जेस आणि तत्सम गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा अतिवापर हा आर्थिक संकटाला कारणीभूत ठरू शकतो.

वार्षिक शुल्क

क्रे़डिट कार्ड घेताना त्यावर वार्षिक शुल्क (Annual fee) घेतली जाते की नाही, हे तपासून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डसच्या प्रकारानुसार वार्षिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क 500 ते 3000 रुपये इतके असू शकते. दरवर्षी हे पैसे भरणे बंधनकारक असते. अनेकदा क्रेडिट लिमिट वाढवण्याच्या नादात आपल्याला जादा वार्षिक शुल्क भरावे लागू शकते.

ड्यू डेट फी

तुम्ही क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरत असाल तर कोणतीही अडचण नाही. मात्र, दिलेल्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास मोठी अडचण होऊ शकते. ड्यू डेट उलटून गेल्यानंतर पैसे भरायला गेल्यास त्यावर बराच दंड आकारला जातो. मासिक गणितावर दंडाची रक्कम ठरवली जाते. मात्र, वार्षिक गणिताच्या आधारे तुलना केल्यास तुमच्याकडून 30 टक्के दंड आकारला जातो.

डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा चार्ज

अनेकदा आपण पेटीएम किंवा अन्य एखाद्या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतो. मात्र, या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

पैसे काढल्यास चार्ज

क्रेडिट कार्डामधून तुम्ही पैसे काढू शकता. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डातून मोठी रक्कम काढताना नेहमीच काळजी बाळगणे गरजेचे आहे.

जीएसटी भरावा लागतो

तुम्ही क्रेडिट कार्डसच्या सेवांचा वापर करता तेव्हा त्यावर जीएसटी लागतो. आगामी काळात क्रेडिट कार्डसंबधी सेवांवर 15 टक्के जीएसटी आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते.

(Know about Credit Card use and charges)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.