LIC Policy: ‘या’ पॉलिसीत पैसे गुंतवा; प्रत्येकवर्षी 22,500 आणि मॅच्युरिटीवेळी मिळतील 5 लाख रुपये

LIC | ही एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येकवर्षी एक निश्चित रक्कम मिळते आणि पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यावर 5 लाख रुपये मिळतात.

LIC Policy: 'या' पॉलिसीत पैसे गुंतवा; प्रत्येकवर्षी 22,500 आणि मॅच्युरिटीवेळी मिळतील 5 लाख रुपये
मुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 8:28 AM

नवी दिल्ली: सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील कोट्यवधी लोक खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी LICच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC ची जीवन आनंद पॉलिसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Know everything about LIC jeevan anand policy)

ही एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येकवर्षी एक निश्चित रक्कम मिळते आणि पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यावर 5 लाख रुपये मिळतात.

5 लाखांची रक्कम कशी मिळेल?

एखाद्या व्यक्तीने 36 व्या वर्षी या पॉलिसीत गुंतवणुकीला सुरुवात केली तर पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी साधारण 2500 हजार रुपये जमा करावे लागतील. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 22500 रुपयांचा वार्षिक बोनस मिळायला सुरुवात होईल. ही रक्कम 20 वर्षांपर्यंत मिळेल. याशिवाय, तुम्हाला 10 हजारांचा अतिरिक्त बोनसही दिला जातो.

दुहेरी फायदा

जीवन आनंद पॉलिसीमध्ये कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये मिळतात. तुम्ही 2500 हजारांचा मासिक हप्ता भरत असाल तर तुम्हाला 22500 रुपयांचा बोनस मिळतो. याची आकडेमोड करायची झाल्यास संपूर्ण पॉलिसीवर तुम्हाला जवळपास साडेचार लाखांचा बोनस आणि 5 लाखांची मॅच्युरिटीची रक्कम मिळते.

4.60 लाखांचा बोनस

एलआयसीच्या संकेतस्थळावर तुम्हाला या योजनेची माहिती मिळू शकते. यामध्ये तुम्हाला 5 लाखांची मॅच्युरिटीची रक्कम आणि एकूण 4.60 लाखांचा बोनस असा दुहेरी लाभ मिळतो.

इतर बातम्या

LIC च्या या पॉलिसीत पैसे 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर

(Know everything about LIC jeevan anand policy)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.