तुमच्याकडे 1 रुपयांची नोट आहे, मग तुम्हीही बनू शकता श्रीमंत, जाणून घ्या कसे?

त्यामुळे जर तुमच्याकडे असलेली जुनी नोट ही एखाद्या विशिष्ट नंबरची असेल तर ती तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. (One Rupee Note Can Make You Rich)

तुमच्याकडे 1 रुपयांची नोट आहे, मग तुम्हीही बनू शकता श्रीमंत, जाणून घ्या कसे?
one-rupee note
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 12:12 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या पॉकेट, पर्स किंवा कपाटात 1 किंवा 2 रुपयांची जुनी नोट असते. अनेकजण ही नोट कधीही खर्च करत नाही. या जुन्या नोट चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजण शौक म्हणून ही नोट आपल्या पॉकेटमध्ये ठेवतात. काहीजण वर्षानवर्षे ही नोट जपून ठेवतात. तसेच मोठ्या गर्वाने ही नोट असल्याचे सांगतात. अनेकांना या जुन्या नोट जपून ठेवणं फार आवडते. (Know How a One Rupee Note Can Make You Rich)

गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑनलाईन वेबसाईटवर खूप जुन्या आणि लक्झरी नंबरच्या नोटा विकल्या जात आहेत. ज्या लोकांना नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा अत्यंत महागड्या किंमतीत विकत घेत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे असलेली जुनी नोट ही एखाद्या विशिष्ट नंबरची असेल तर ती तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. तसेच जर तुम्हाला नोट खरेदी करायची असल्यास ती कशी खरेदी करता येईल? यासाठी कसे पैसे आकारले जातील, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कोणत्या नोटांना मागणी?

अनेक ऑनलाईन वेबसाईटवर लक्झरी नंबरच्या नोट या महागड्या किंमतीत विकल्या जातात. यात 888888 किंवा 123456 असे सिरीअल नंबरच्या नोटींचा समावेश असू शकतो. यासोबतच बराच काळापूर्वीच्या जुन्या नोटाही लोक खरेदी करतात. काही लोक ठराविक राज्यपालांच्या सहीमुळे त्याची किंमत वाढू शकते. तर काहीजण स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीचा लकी नंबर असेल तर खरेदी करणारी व्यक्ती जास्त पैसे देते. तसेच काही जण एखाद्याची जन्मतारीख असेल तर तीही खरेदी करतात.

किती रुपयांना विक्री?

एका 100 रुपयांच्या जुन्या नोटीवर राज्यपाल बी.सी. रामरावांचे यांचे चिन्ह होतं. काही दिवसांपूर्वी coinbazzar.com वर ही नोट 16000 रुपयांना विकली होती. ही नोट राज्यपाल बी.सी. रामराव यांनी जारी केली होती. तर 1957 मध्ये राज्यपाल एच.एम. पटेल यांनी सही केलेला एक रुपयांच्या नोटांचे बंडल 45 हजार रुपयांना विकण्यात आला होता. या नोटीचा अनुक्रमांक 123456 असा होता. याशिवाय राज्यपाल एस. व्यंकटारामन यांची सही असलेला 500 रुपयांच्या नोटांचे बंडल हे 1.55 लाख रुपयांना विकण्यात आले होते. या नोटांचा नंबर हा 1616 पासून सुरू होतो. विशेष म्हणजे अशाचप्रकारे अनेक एक रुपयांच्या नोटा महागड्या किंमतीत विकल्या जात आहेत. तसेच सध्या याची फार मागणी आहे.

आपण श्रीमंत कसे होऊ शकता?

जर तुमच्याकडेही एक रुपयाची फार जुनी नोट असेल, ती लोकांना आवडेल, ती फार जुन्या काळातली असेल किंवा त्यामागे काही विशेष कथा असेल तर ती नोट सहज खरेदी केली जाते. यासाठी तुम्हाला या नोटेचा फोटो Ebay सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करा.  यानंतर Ebay तुम्हाला लिलावाचा पर्याय देते. त्याद्वारे तुम्ही त्याचे मूल्य ठरवून त्याचा लिलाव करु शकता आणि ती नोट तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. (Know How a One Rupee Note Can Make You Rich)

संबंधित बातम्या : 

IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

Bitcoin च्या भावात घसरण सुरुचं, जगातील 10 क्रिप्टोकरन्सीचे दर वाचा एका क्लिक वर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.