अब्जाधीश बिल गेट्स यांची चाय पे चर्चा, नागपूरच्या डॉली चायवाल्याला एका चहाचे किती रुपये दिले?

अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. नुकताच हे प्री वेडिंग फंक्शन पार पडलंय. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे भारतामध्ये दाखल झाले. अब्जाधीश बिल गेट्स देखील या फंक्शनसाठी भारतात आले होते.

अब्जाधीश बिल गेट्स यांची चाय पे चर्चा, नागपूरच्या डॉली चायवाल्याला एका चहाचे किती रुपये दिले?
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 11:44 AM

मुंबई : अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान सुरू होते. विशेष म्हणजे या फंक्शनसाठी विदेशातूनही लोक दाखल झाले. खास राहण्याची आणि खाण्याची पाहुण्यांसाठी व्यवस्था करण्यात आली. या तीन दिवसांमध्ये जेवणात 2500 आणि नाश्त्यात 700 पदार्थ पाहुण्यांना वाढली गेली. विशेष बाब म्हणजे एक पदार्थ परत वाढला गेला नाही. प्रत्येक वेळी नवीन पदार्थ वाढले गेले. हेच नाही तर गावातील लोकांसाठी देखील खास जेवणाचे आयोजन अंबानी कुटुंबाकडून करण्यात आले. अनंत अंबानी, राधिका मर्चंट आणि मुकेश अंबानी यांनी देखील गावातील लोकांना प्रेमाने जेवण वाढले.

या प्री वेडिंग फंक्शनसाठी गुजरातमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे देखील पोहचले होते. तीन दिवस गुजरातमध्येच बिल गेट्स हे मुक्कामी होते. अब्जाधीश बिल गेट्स यांनी भारतामध्ये येऊन चाय पे चर्चा देखील केली. विशेष म्हणजे चक्क डॉली चायवाल्याची चहा पितानाही बिल गेट्स हे दिसले. याचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

नागपूरच्या डॉली चायवाल्याच्या टपरीवर चक्क बिल गेट्स हे चहा पिताना दिसत आहेत. डॉली चायवाल्याचे स्वॅगचे लाखो दिवाने आहेत. आता या टपरीवर बिल गेट्स यांनीही चहा पिला. याबद्दल बोलताना आता डॉली चायवाला दिसला. डॉली चायवाला म्हणाला की, बिल गेट्स आले आणि त्यांनी एक चहा मागितला. मी त्यांना ओळखलेच नव्हते.

मी नेहमी ज्याप्रमाणे ग्राहक चहासाठी येतात, त्याचप्रमाणे बिल गेट्स यांना देखील चहा दिला. बिल गेट्स यांनी चहा पिला आणि इतर लोक जेवढे पैसे देतात, तेवढेच पैसे त्यांनी मला दिले. माझ्या टपरीवर सात ते दहा रूपयांपर्यंत चहा मिळतो. मला बिल गेट्स यांनी देखील तेवढेच पैसे दिले. मला अगोदर माहिती नव्हते की, हे बिल गेट्स आहेत, मला काहीच कल्पनी नव्हती.

बिल गेट्स यांनी डॉली चायवाल्याच्या टपरीवर चहा पिला आणि ते फोटो व्हायरल झाल्यानंतर तूफान चर्चा रंगताना दिसली. थेट डॉली चायवाल्याच्या टपरीवर बिल गेट्स हे चहा पिण्यासाठी गेले. डॉली चायवाल्याची खासियत म्हणजे तो फक्त ग्राहकांना चहाच पाजवत नाही तर तो ग्राहकांचे मनोरंजन देखील जोरदार करतो. डॉली चायवाल्याचा चहा देखील अत्यंत भारी असतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.