तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? या नंबरवर मेसेज करुन एका मिनिटात माहिती मिळवा

सरकारने देखील संकट काळात पीएफमधून पैसे काढण्याची सूट दिलीय. हे पैसे काढण्याची अगदी साधीसोपी पद्धत आहे.

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? या नंबरवर मेसेज करुन एका मिनिटात माहिती मिळवा
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 5:21 PM

Provident Fund Balance मुंबई : कोरोना काळात अनेकांवर आर्थिक संकट आलंय. अशात प्रत्येकाला पैशांची गरज भासू लागलीय. अशा परिस्थिती आपल्याकडे असलेल्या आपतकालिन निधीचा उपयोग करण्याबाबत निर्णय घ्यावा लागतो. आपतकालिन निधी म्हटलं की लगेचच भविष्यनिर्वाह निधी म्हणजे Provident Fund ची आठवण होते. सरकारने देखील संकट काळात पीएफमधून पैसे काढण्याची सूट दिलीय. हे पैसे काढण्याची अगदी साधीसोपी पद्धत आहे. मात्र, त्याआधी या PF खात्यात नेमके किती पैसे आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे (Know how to check balance of PF account by call or SMS in few minutes).

मेसेज करुन माहिती कशी घ्यायची?

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे माहिती करुन घेणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एक कॉल किंवा मेसेज करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबईल नंबरवरुन “EPFOHO UAN” टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी आधी निवडलेली भाषा असते. याशिवाय मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, मल्यालम, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषांचा समावेश आहे.

आपल्या मातृभाषेत माहिती मिळवण्यासाठी हे करा

तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये माहिती हवी असेल तर त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलनंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन आपल्या भाषेतील पहिले तीन अक्षरं टाईप करा. उदाहरणार्थ मराठीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन 7738299899 नंबरवर पाठवा.

मिसकॉल देऊन पीएफ बॅलन्स कसा माहिती करणार?

तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊनही पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करता येतो. आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

UMANG अॅपच्या मदतीने बॅलन्स चेक करा

याशिवाय UMANG अॅपचा वापर करुनही प्रोविडेंट फंडाचा बॅलन्स चेक करता येतो. यासाठी तुम्हाला अॅम्पॉयी-सेंट्रिक सर्विसवर (employee-centric services) क्लिक करावं लागतं. यानंतर व्यू पासबुकवर क्लिक करा. येथे तुमचा यूएएन नंबर आणि OTP टाकून बॅलन्स चेक करा.

हेही वाचा :

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

कोरोना काळात PF अकाउंटमधून पैसे काढता येतील, तीन दिवसात पैसे मिळतील, पण कसे? ते वाचा

नोकरदारांसाठी मोठी बातमी, पगारातील प्रस्तावित बदल टळला, सरकारचा निर्णय काय?

व्हिडीओ पाहा :

Know how to check balance of PF account by call or SMS in few minutes

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.