एका चुकीमुळे गमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी

एटीएम कार्ड क्लोन करून हे दोघेही ग्राहकांच्या खात्यामधून पैसे लंपास करायचे. यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

एका चुकीमुळे गमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रोग्रामअंतर्गत ग्राहकांना लगेच खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड मिळतं. जे बँकिंग व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 10:36 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत बँकिंग क्षेत्रात फसवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असंच एक एटीएम कार्ड क्लोनिंगचं प्रकरण समोर आलं आहे. नोएडा पोलिसांनी बुधवारी एटीएम कार्डला क्लोनिंग करत कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. एटीएम कार्ड क्लोन करून हे दोघेही ग्राहकांच्या खात्यामधून पैसे लंपास करायचे. यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (Know how you can save your bank atm card from card cloning)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींकडून 96 एटीएम कार्ड, डेबिट कार्ड डेटाचे 17 कागदपत्रं, 10 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर संशयित सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. हे लोक एटीम कार्ड क्लोनिंग करत काही मिनिटांत ग्राहकांच्या खात्यामधून लाखो रुपये लंपास करत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम क्लोनिंग नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

एटीएम कार्डला क्लोनिंग करण्यासाठी लुटेरे स्कॅनिंग स्लॉट असणाऱ्या डिव्हाइसचा वापर करतात. हे डिव्हाइस PoS मशिनींसारखं दिसतं, ज्याच्यामुळे कार्ड धारकांना लुटेऱ्यांचा पत्ताही लागत नाही. फसवणूकीसाठी वापरल्या जाणार्‍या मशीनमध्ये असं सॉफ्टवेअर असतं ज्यात 3 हजार कार्डाची माहिती साठवली जाऊ शकते. त्यामुळे लुटेरे ग्राहकांच्या क्रेडिट-डेबिट कार्डाद्वारे डिव्हाइसवर स्वाइप करतात आणि मशीनमधील त्यांची माहिती गोळा करतात.

EMV चिप बेस्ड कार्डचा करा वापर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॅगस्ट्रिप कार्डऐवजी EMV चिप बेस्ड कार्डचा वापर अनिवार्य केला आहे. EMV कार्डमध्ये असलेली मायक्रोचिप डेटा चोरी होण्यापासून वाचवते. इतकंच नाही तर एखाद्याने कार्डला स्कॅन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला फक्त एन्क्रिप्टेड माहिती मिळते आणि मोठी फसवणूक टळते. (Know how you can save your bank atm card from card cloning)

कार्डचा वापर करताना ‘या’ बाबी ठेवा लक्षात जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्डचा वापर करत असाल तर कॅमेऱ्याकडे लक्ष असुद्या. त्याद्वारे कोणी तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत नाही ना, याची काळजी घ्या. PoS मशिनींमध्ये कार्डचा पिन टाकताना आपल्या हाताने मशीन झाकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या हॉटेल, पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी पीओएस मशिनद्वारे कार्ड स्वाईप करत असाल आणि मशीन जर जास्त वजनाची लागत असेल तर तातडीने त्याची तपासणी करा.

तुम्हाला येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवा कार्डने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल फोनवर व्यवहार केल्याचा मेसेज नाही आला तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. याशिवाय बँकेतून येणारा प्रत्येक मेसेज काळजीपूर्वक वाचा आणि तो तपासा. यासंबंधीची अधिक माहिती तुम्ही बँक स्टेटमेंटमधूनही घेऊ शकता.

इतर बातम्या –

राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे

कर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप

(Know how you can save your bank atm card from card cloning)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.