AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एमएसएमई( MSMEs) क्षेत्राचे पुनरुज्जीवन होईल आणि फसवणुकीची शक्यता शून्यावर येईल, असे म्हटले जाते. (Know more about these 15 banks that will adopt blockchain technology)

या 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती
या 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 3:03 PM

नवी दिल्ली : तंत्रज्ञानातील प्रगतीच्या दिशेने पुढे जात देशातील 15 बँकांनी एकत्रितपणे ब्लॉकचेन तंत्रज्ञान अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. हे तेच तंत्रज्ञान आहे ज्यावर बिटकॉईन, इथेरियम, डोजेकोईन सारख्या क्रिप्टोकरन्सी आधारीत आहेत. खरं तर एसबीआय(SBI), एचडीएफसी(HDFC), आयसीआयसीआय(ICICI), कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँकेसह देशातील 15 प्रमुख बँकांनी इंडियन बँक्स ब्लॉकचेन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (IBBIC) नावाची एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. (Know more about these 15 banks that will adopt blockchain technology)

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एमएसएमई( MSMEs) क्षेत्राचे पुनरुज्जीवन होईल आणि फसवणुकीची शक्यता शून्यावर येईल, असे म्हटले जाते. आयबीबीआयसी(IBBIC) मुळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लेटर ऑफ क्रेडिट (Letters of Credit (LCs), जीएसटी इनव्हॉईस, ई-वे बिल संबंधित समस्या सोडवेल. त्यामुळे कागदी कामात लक्षणीय घट होईल तसेच व्यवहाराच्या प्रक्रियेत लागणारा वेळही कमी होईल. याशिवाय प्रत्येक व्यवहार रेकॉर्डवर आणि सुरक्षित होईल.

व्यवसायासाठी खूप महत्वाची आहे एल.सी.

एलसी(LC) किंवा लेटर्स ऑफ क्रेडिट(Letters of Credit) हे व्यवसायासाठी खूप महत्वाचे आहे. हे बँकेद्वारे जारी केले जाते. जेव्हा एखादी बँक एलसी जारी करते तेव्हा कर्जदार पैसे वेळेत फेडेल अशी हमी जारी करणार्‍या संस्थेला दिली जाते. जर खरेदीदार हे करण्यास असमर्थ असेल तर बँक एलसी घेणार्‍या घटकाला थकबाकी देते. सोप्या शब्दांत, याला बँक गॅरंटी म्हटले जाऊ शकते. विशेषत: आयात आणि निर्यातीच्या बाबतीत एलसीची अधिक गरज आहे.

पेमेंटसाठी इन्व्हॉईसला टोकनमध्ये रूपांतरीत केले जाईल

जर टोकन आधारीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या रूपात लेटर ऑफ क्रेडिट दिले गेले तर प्रक्रियेत लागलेला वेळ कमी होईल. याशिवाय मानवी चुकांना वाव असणार नाही तसेच फसवणुकीचीही शक्यता नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, मूळ चलन टोकनच्या रूपात रूपांतरीत केले जाईल. हे टोकन पेमेंटसाठी वापरले जाईल.

एका वर्षाच्या आत सुरु होईल ही यंत्रणा

बिझनेस इनसाइडर इंडियाच्या अहवालानुसार ही यंत्रणा येत्या एक वर्षाच्या आत काम करण्यास सुरवात करेल. नव्या कंपनीत सर्व 15 बँकांचे 6.66 टक्के समान भागभांडवल असेल. जर एखादी नवीन बँक किंवा वित्तीय संस्था त्यात सामील होऊ इच्छित असेल तर ती कोणत्याही वेळी सामील होऊ शकते.

या आहेत 15 सदस्य बँका

या 15 सदस्यीय बँकांमध्ये 4 सरकारी आणि 11 खासगी क्षेत्रातील बँका आहेत. एसबीआय, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा अशा चार सरकारी बँका आहेत. त्याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, येस बँक, आरबीएल बँक, आयडीएफसी बँक, दक्षिण भारतीय बँक आणि फेडरल बँक या खाजगी बँकांमध्ये आहेत. याशिवाय या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय बँक स्टँडर्ड चार्टर्डचा समावेश आहे.

इन्फोसिसचे आयटी समर्थन

ही सिस्टम इन्फोसिसच्या ब्लॉकचेनवर आधारीत प्लॅटफॉर्म फिनाकल कनेक्टवर डिझाईन केले जाईल. पायलट म्हणून एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेने वैयक्तिक स्तरावर याचा प्रयोग केला आहे. (Know more about these 15 banks that will adopt blockchain technology)

इतर बातम्या

मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.