Gold Price : सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय? मग वाचा तोळ्याचे दर आणखी किती स्वस्त होणार
सोन्याच्या दरांचा आगामी काळातील प्रवास कसा असेल, सोनं आणखी स्वस्त होईल की महाग, अशा अनेक प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं आणि त्याचा हा आढावा.
मुंबई : भारतात बहुतांश लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. आतापर्यंत सोन्याच्या दरांचा प्रवास पाहिला तर अनेकांना ही गुंतवणूक फायद्याचीही ठरलीय. विशेष म्हणजे भारतात लग्न समारंभातही सोन्याचे दागिणे करण्याची परंपरा असल्यानं प्रत्येक घरात सोन्याची थोडी फार का होईना गुंतवणूक दिसतेच. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या झळाळीला काहीशी उतरती कळा लागल्यानं अनेकांची काळजी वाढलीय. दुसरीकडे अनेकजण याच काळाला गुंतवणुकीची चांगली संधी म्हणत आहेत. तसेच यात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. म्हणूनच सोन्याच्या दरांचा आगामी काळातील प्रवास कसा असेल, सोनं आणखी स्वस्त होईल की महाग, अशा अनेक प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं आणि त्याचा हा आढावा (Know the expert opinion on Gold Silver Petrol Diesel future price in India).
आगामी काळात सोने चांदीचे दर कसे असणार?
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात, “भारतात सध्या कोणताही उत्सव किंवा सण नाही. याशिवाय खरेदी विक्रीचा लग्नाचा काळही संपलाय. तसेच सोन्यावरील हॉलमार्किंगचे नियम लागू झालेत. या सर्वांचा सोन्याच्या बाजारावर परिणाम झालाय. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहतील किंवा कमी होतील.” भारतातील गुंतवणूकदार सध्या सोने चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सोने दरात जशी वेगाने पडझड होईल तशी गुंतवणूक वाढून या किमती पुन्हा वेगाने वाढतील. त्या परिस्थितीत सोन्याच्या दरात थोडीशी सुधारणा होईल. मात्र, सध्यातरी तशी कोणतीही स्थिती नाही. चांदीच्या दरातही अशाचप्रकारे वाढ होताना दिसेल. बाजार खुले झाल्यास चांदीची औद्योगिक मागणी वाढेल. त्यामुळे चांदीचे दरही वाढतील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
इंधन दरवाढ सुरुच राहणार?
कोरोना लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनचे निर्बंध कमी होतील आणि सर्व व्यवहार सुरळीत होऊन इंधनाची मागणी वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीही वाढलीत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात जसे इंधन दर वाढतात, तसं कच्च्या तेलाचं उत्पादन देखील वाढवलं जातं. उत्पादन वाढलं की पुरवठा सुरळीत होऊन कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात. तज्ज्ञांनी आगामी काळात ब्रेंटमध्ये 80 डॉलर प्रति डॉलरपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अनुज गुप्ता यांनी इंधनाचे दर 5 हजारपासून 5700 रुपये प्रति बॅरलपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.
इंधनाच्या दरात सातत्याने वाढ
देशात अनेक ठिकाणी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा संपूर्ण बोजा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर येत आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा आकडा केव्हाच पार केलाय. ओडिशाच्या मल्कानगिरीत 101.12 रुपये प्रति लिट, कोरापुट 100.46 रुपये दर झालेत. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे दर 100 पार गेलेत. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि लडाखचा समावेश आहे.
मुंबईत पेट्रोल 103.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.72 रुपये प्रति लिटरवर पोहचलंय. 4 मे पासून इंधनाच्या दरात तब्बल 28 वेळा वाढ झालीय. या काळात पेट्रोलचे दर 7.10 रुपयांनी आणि डिझेलचे दर 7.50 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत.
हेही वाचा :
Gold Price : सोने खरेदीदारांसाठी खूशखबर ! दोन दिवसानंतर दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर
सरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार
PHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट
व्हिडीओ पाहा :
Know the expert opinion on Gold Silver Petrol Diesel future price in India