Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GOLD PRICE TODAY : महाराष्ट्रातील सोने बाजार पडझडीनंतर सावरला, मुंबईसह पुण्यात भाववाढ

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या भावातील पडझड सावरल्याचं चित्र दिसून आलं. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली.

GOLD PRICE TODAY : महाराष्ट्रातील सोने बाजार पडझडीनंतर सावरला, मुंबईसह पुण्यात भाववाढ
सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:13 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सोने गुंतवणुकदारांसाठी आजचा (सोमवार) दिवस आशा पल्लवित करणारा ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या भावातील पडझड सावरल्याचं चित्र दिसून आलं. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत आज (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची वाढ नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याची भावात पडछड दिसून येत आहे. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49250 व 22 कॅरेट सोन्याला 45250 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 49250 रुपये (रु.50 वाढ) • पुणे- 49100 रुपये (रु 40 वाढ) • नागपूर- 49250 रुपये (रु.50 वाढ) • नाशिक- 49100 रुपये (रु.40 वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 45,200 रुपये (रु 100 वाढ) • पुणे- 45100 रुपये(रु 50 वाढ) • नागपूर- 45200 रुपये(रु.100 वाढ) • नाशिक- 45100 रुपये(रु.50 वाढ)

सोन्याच्या किंमती घसरणार:

HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.

निर्धास्त राहा, मिस्ड् कॉल करा:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

SHARE MARKET: शेअर बाजारात मोठी पडझड, सेंन्सेक्स 1024 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांत चलबिचल

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

‘या’ चार बँकांनी केलेत त्यांच्या नियमावलीत बदल, खातेधारकांनी जाणून घेणे महत्त्वाचे…

छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.