GOLD PRICE TODAY: पडझडीनंतर सोने बाजार सावरला, महाराष्ट्रात सोनं महाग, वाचा आजचे भाव

महाराष्ट्रातील सोने गुंतवणुकदारांसाठी सलग दुसरा दिवस भाववाढीचा ठरला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत आज (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ नोंदविली गेली.

GOLD PRICE TODAY: पडझडीनंतर सोने बाजार सावरला, महाराष्ट्रात सोनं महाग, वाचा आजचे भाव
सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 7:34 PM

मुंबई – महाराष्ट्रातील सोने गुंतवणुकदारांसाठी सलग दुसरा दिवस भाववाढीचा ठरला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत आज (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या भावात पडछड दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या भावातील पडझड सावरल्याचं चित्र दिसून आलं. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49530 व 22 कॅरेट सोन्याला 45400 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे)

• मुंबई- 49530 रुपये (रु.280 वाढ) • पुणे- 49500 रुपये (रु 400 वाढ) • नागपूर- 49530 रुपये (रु.280 वाढ) • नाशिक- 49500 रुपये (रु.400 वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 45,400 रुपये (रु 200 वाढ) • पुणे- 45,350 रुपये(रु 250 वाढ) • नागपूर- 45400 रुपये(रु.200 वाढ) • नाशिक- 45,350 रुपये (रु.250 वाढ)

सोन्याच्या किंमती घसरणार

HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.

 मिस्ड् कॉल वरून जाणू घ्या सोन्याचे भाव

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल दिल्यानंतर तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. याद्वारे तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची खरेदी करताना सावधान

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची माहिती मिळणार असल्याने या अ‍ॅपचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

संबंधित बातम्या

डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला झटका, कर्जदाते लटकले, पैसे मिळण्यास विलंब होणार?

PM Cares Fund : पीएम केअर्समध्ये पहिल्या वर्षी 11 हजार कोटी जमा, 3976 कोटी खर्च, महामारीशी लढवण्यासाठी झालेली स्थापना

LIC IPO: आयपीओचं काऊंटडाउन सुरू, पॉलिसीधारकांना खास सवलत; ड्राफ्ट फायनल?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.