Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतका होणार खिसा खाली, आजचा हा आहे भाव

Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांची चंगळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलात जोरदार घसरण सुरु असून कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे. आज सर्वसामान्यांना एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतके रुपये खर्च करावे लागतील.

Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतका होणार खिसा खाली, आजचा हा आहे भाव
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली : भारतीय तेल विपणन कंपन्यांची चंगळ सुरु आहे. कच्चा तेलाचे भाव घसरल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे. आज 15 जून रोजी किंमतीत पुन्हा घसरण झाली. ब्रेंट क्रूड ऑईल 73.19 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 68.30 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा (Petrol Diesel Price) आजचा भाव काय आहे? आज सर्वसामान्यांना एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतके रुपये खर्च करावे लागतील.

दरात इतकी तफावत तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते. केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.15 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.58 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.40 तर डिझेल 93.89 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.24 तर डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.42 तर डिझेल 94.88 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.68 रुपये आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.31 आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.38 रुपये तर डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.