QR Code म्हणजे नक्की काय? कसे होते पेमेंट, जाणून घ्या सर्व माहिती

आजकाल डिजीटल जमाना आहे. सगळीकडे ऑनलाइन पेमेंट होतं. दूध, भाजीपाल्यापासून ते पेट्रोल भरेपर्यंत आजकाल सगळीकडे क्यूआर कोडचा वापर करून पैसे देता येतात. फक्त एक कोड स्कॅन करून अवघ्या काही सेकंदात पेमेंट पूर्ण करता येतं. पण हा क्यूआर कोड म्हणजे नक्की काय, ऑनलाइन पेमेंट कसे होते, ही सर्व माहिती जाणून घेऊया.

QR Code म्हणजे नक्की काय? कसे होते पेमेंट, जाणून घ्या सर्व माहिती
QR Code म्हणजे नक्की काय? Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:53 PM

आजकाल डिजीटल जमाना आहे. सगळीकडे ऑनलाइन पेमेंट (Online payment) केलं जातं. दूध, फळं, भाजीपाला यापासून कपडे, भांडी घेणे ते पेट्रोल भरण्यापर्यंत सगळीकडे क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून पेमेंट करता येतं. एखादी गोष्ट खरेदी करून त्याचे पैसे द्यायचे असोत वा कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे (money transfer)असोत, आजकाल क्यूआर कोडमुळे सर्व कामं सोपी झाली आहेत. अवघ्या काही सेकंदात पैसे देता येतात आणि सुट्टे पैसे नसल्यास, त्याचीही अडचण येत नाही. मात्र हा क्यूआर कोड म्हणजे नेमकं काय, एका स्कॅनिंगमुळे (scanning) पैशांचे पेमेंट नेमकं कस होतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. चला, मग जाणून घेूया क्यू आर कोडबद्दलची सर्व माहिती.

क्यूआर कोड (QR Code) म्हणजे नेमके काय ?

क्यू आर कोडचे संपूर्ण नाव आहे Quick Response Code. हा कोड अतिशय वेगाने काम करतो. काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये एक पॅटर्न असतो. त्यामध्ये यूआरएल आणि मोबाईल नंबर लपवलेला असतो. जेव्हा तुम्ही तो बॉक्समधील कोड स्कॅन करता, तेव्हा त्या व्यक्तीचे डिटेल्स तुमच्या मोबाइलमध्ये येतात व तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन मिळतो. जी रक्कम असेल, तेवढा आकडा टाकून पेमेंट करता येतं. आजकाल सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यापासून अनेक कंपन्यांमध्ये पेमेंटसाठी क्यूआर कोडचा वापर केला जातो.

क्यूआर कोडचा वापर कुठे होतो?

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर क्यूआर कोडचा वापर करून पेमेंट करणे हा सर्वात सोपा पर्याय आहे. तुम्हाला फक्त समोरील कोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतर जेवढी रक्कम द्यायची आहे त्याचा आकडा आणि युपीआय आयडी टाकला की पेमेंट प्रक्रिया पूर्ण होते. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टे पैसे नसल्यास अडचण होत नाही.

हे सुद्धा वाचा

क्यूआर कोडचा वापर फक्त पैशांच्या पेमेंट पुरता मर्यादित नाही. त्याचा वापर इतर कामांसाठीही होतो. आजकाल प्रत्येक प्रॉडक्ट, वस्तूंवर क्यूआर कोड असतो. तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची सर्व माहिती मिळू शकते. तसेच बिझनेसमध्येही क्यूआर कोडचा वापर होतो. बिझनेस कार्डच्या स्वरूपात ते वापरले जाते. तुम्हीही ते बनवू शकता. ते कसे, ते जाणून घेऊया..

कसा बनवाल QR Code:

– क्यूआर कोड बनवणाऱ्या कोणत्याही वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे.

– तिथे तुम्हाला URL, Image, VCard, Email यासह अनेक पर्याय मिळतील .

– जर तुम्हाला क्यूआर कोड बनवायचा असेल तर तुम्हाला कोणतीही वेबसाइट अथवा प्रॉडक्टची युआरएल (URL) तिथे टाकावी लागेल.

– त्यानंतर क्यूआर कोड तयार होईल. तुम्ही त्याचा वापर करू शकता.

QR Code स्कॅन करण्याची पद्धत:

आजकाल सर्वत्र क्यूआर कोड असतो. तो स्कॅन करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्मार्टफोन आणि क्यूआर स्कॅनिंग ॲपचा वापर करावा लागेल. गूगलच्या प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) काही स्कॅनिंग ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे हे काम होऊ शकते. जर तुम्हाला पैशांचे पेमेंट करण्यासाठी कोड स्कॅन करायचा असेल तर ज्या पेमेंट ॲपद्वारे तुम्ही पैसे भरणार असाल त्या ॲपद्वारे कोड स्कॅन करा. दर तुम्ही ॲंड्रॉईड फोन अथवा टॅब वापरत असाल, तर तेथे तुम्हाला अनेक स्कॅनर वेबसाइट मिळतील. ios युजर असाल तर आयफोनसाठी क्यूआर स्कॅनर ॲप डाऊनलोड करू शकता.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.