SHARE MARKET: शेअर बाजारात तेजीचं सत्र, 740 अंकांची वाढ; 4 लाख कोटींचा नफा

आज सेन्सेक्स वर टॉप-30 पैकी 21 शेअर तेजीसह आणि 9 शेअर घसरणीसह बंद झाले. आज(बुधवार) बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली.

SHARE MARKET: शेअर बाजारात तेजीचं सत्र, 740 अंकांची वाढ; 4 लाख कोटींचा नफा
शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्रImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 6:57 PM

नवी दिल्लीः शेअर बाजारात (Share market update) सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स 740 अंकांच्या तेजीसह 58683 च्या टप्प्यावर पोहोचला. निफ्टी 173 अंकांच्या तेजीसह 17498 वर बंद झाला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये 1194 अंकाची तेजी नोंदविली गेली आहे. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजाराचा एकूण मार्केट कॕप (market cap) 263.84 लाखावर बंद झाला. चालू आठवड्यात आतापर्यंत गुंतवणुकदारांच्या (investor) संपत्तीत 4 लाख कोटींची भर पडली आहे. आज सेन्सेक्स वर टॉप-30 पैकी 21 शेअर तेजीसह आणि 9 शेअर घसरणीसह बंद झाले. आज (बुधवार) बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदविली गेली.

तेजी-घसरण कायम!

रशिया-युक्रेन दोन्ही देशांत संघर्ष निवळण्याचं चित्र आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील निवळणाऱ्या स्थितीमुळे गुंतवणुकदारांत सकारात्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, चीनमध्ये पुन्हा कोरोना संकटानं डोकं वर काढलं आहे. चीनच्या अनेक भागांवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. त्यामुळे काळात तेजी-घसरणीचं सत्र कायम असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

क्रूड आॕईल डाउन, मार्केट अप!

सध्या बाजारात तेजीचं वातावरण असलं तरी अस्थिरता कायम असेल असं मत आयसीआयसीआय मार्केटन व्यक्त केलं आहे. सध्याच्या घसरणीच्या स्थितीत शेअर्सची खरेदी जोखीम ठरू शकते. कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी कच्च्या तेलाच्या घसरणीचं कनेक्शन शेअर बाजाराशी जोडलं आहे. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यास महागाई दरात घसरण नोंदविली जाईल आणि बाजारात सकारात्मकता निर्माण होईल.

आशिया ते अमेरिका तेजी:

बाजारातील तेजीच्या काळात विदेशी गुंतवणुकदारांनी 35.47 कोटी रुपयांची खरेदी केली. रिलायन्स सिक्युरिटीजचे मिथिल शाह यांनी युक्रेन विवाद निवळल्यामुळे अमेरिकन बाजारात तेजी नोंदविली गेली आहे. त्यामुळे आशियाई बाजारात तेजीचं चित्र असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

रुपयांत घसरण

देशांतर्गत शेअर बाजारात तेजी असताना रुपयाची डॉलरच्या तुलनेत 21 पैशांनी घसरण झाली. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 75.94 च्या स्तरावर बंद झाला. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचं सत्र सुरू आहे. त्यामुळे महागाईवर थेट परिणाम होऊन व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या 

केंद्रापाठोपाठ राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

Pune crime | पुणे कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण ; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल; एक अटकेत

बलात्काराचा आरोप असलेला बाबा सीताराम दास साधासुधा नाही! SP, IAS आणि आमदारांचीही बाबावर मर्जी?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.