SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात पडझडीचं सत्र, सेन्सेक्स 104 अंकांनी घसरला; निफ्टी डाउन

सेसेक्स 104 अंकांच्या घसरणीसह 57892 वर पोहोचला. तर निफ्टीत 18 अंकांच्या घसरणीसह 17305 वर बंद झाला. आजच्या दिवसांत बँकिंग शेअर्सच्या (Banking shares) कामगिरीत घसरण झाली.

SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात पडझडीचं सत्र, सेन्सेक्स 104  अंकांनी घसरला; निफ्टी डाउन
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 7:59 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अर्थजगतातील घडामोडींचे थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Stock Market Update) दिसून आले. आज (गुरुवार) शेअर बाजारात तेजी-घसरणीचे सत्र दिसून आलं. शेअर बाजारात दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स व निफ्टी दोन्हींची कामगिरी सरस राहिली. सेसेक्स 104 अंकांच्या घसरणीसह 57892 वर पोहोचला. तर निफ्टीत 18 अंकांच्या घसरणीसह 17305 वर बंद झाला. आजच्या दिवसांत बँकिंग शेअर्सच्या (Banking shares) कामगिरीत घसरण झाली. निफ्टी बँक 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सरकारी बँक आणि खासगी बँक दोन्ही सेक्टरमधील शेअर्सवर विक्रीचा अधिक दबाव होता. मेटल, फार्मा आणि रिअल्टी इंडेक्स कामगिरी निराशाजनक राहिली. केवळ एफएमसीजी शेअर्सवर तेजी नोंदविली गेली. सेसेक्स 30 पैकी 22 शेअरवर कामगिरीत घसरण राहिली. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये (Top gainers) अल्ट्राकेमको, आयसीआयसीआय, इंड्सइंड आणि टीसीएसचा समावेश आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स

• टाटा कॉन्स प्रॉडक्ट (2.76) • एचडीएफसी (2.03) • ओएनजीसी (1.90) • रिलायन्स (1.27) • एचडीएफसी लाईफ (1.07)

आजचे घसरणीचे शेअर्स

• अल्ट्रा-टेक सिमेंट (-1.85) • आयसीआयसीआय बँक (-1.85) • अक्सिस बँक (-1.79) • इंड्सइंड बँक (-1.30) • यूपीएल (-1.19)

कच्चा तेलाच्या भावात घसरण

युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली आहेत. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 94.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत.

बँकिंगवर विक्रीचा दबाव

आज दिवसभरात बँकिंग शेअर्सच्या कारभारात विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी बँकिंगवर घसरण नोंदविली गेली. खासगी तसेच सरकारी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसला. आयटी सेक्टरची कामगिरी निराशाजनकच राहिली.

इतर बातम्या

Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

IPO आधी LICला मोठा फटका! कोरोनामुळे पॉलिसीच्या विक्रीत मोठी घट, गेल्या 3 वर्षात किती नुकसान?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.