Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual fund investment : बाजारात ‘एनएफओ’चा पूर; जाणून घ्या नव्या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

म्युच्युअल फंड कंपन्यांवर तीन महिने एनएफओ (NFO) आणण्याची बंदी होती. ही बंदी एक जुलैरोजी संपली त्यानंतर बाजारात एनएफओचा पूर आलाय. जाणून घेऊयात एनएफओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

Mutual fund investment : बाजारात 'एनएफओ'चा पूर; जाणून घ्या नव्या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 2:10 AM

म्युच्युअल फंड कंपन्यांवर तीन महिने एनएफओ (NFO) आणण्याची बंदी होती. ही बंदी एक जुलैरोजी संपली त्यानंतर बाजारात एनएफओचा पूर आलाय. एक जुलैपासून आतापर्यंत जवळपास 40 पेक्षा जास्त एनएफओ बाजारात आलेत.यात अनेक प्रकारचे फंड आहेत. यामध्ये प्रत्येक नवीन फंड तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो असं काही नाही. त्यामुळे नवीन फंडाची निवड काळजीपूर्वक करावी लागते. आज आपण एनएफओचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊयात. सर्वात आधी एनएफओ म्हणजे काय ते समजून घेऊयात. जेव्हा एखादी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी नवीन स्कीमसाठी पैसे उभारणीसाठी बाजारात येते त्यावेळी त्या फंडांना न्यू फंड ऑफर (NEW FUND OFFER) म्हणजे एनएफओ म्हणतात. एनएफओ आणि आयपीओ IPO हे एका ठराविक कालावधीसाठी खुली असतात. या फंडात गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या फंडात ऑफर प्राइजवर गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची (investment) मुदत संपल्यानंतर फंडातील NAV च्या आधारे फंडात गुंतवणूक करता येते. एनएफओची ऑफर प्राइज साधारपणे 10 रुपये एवढी असते.

फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

बहुतांश गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडेक्स फंड, गोल्ड किंवा रिअल इस्टेट फंडात तेजी असताना तसेच भविष्यातही तेजी असताना गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड्स याच बाबींचा फायदा घेऊन नवीन फंड बाजारात आणतात. नवीन फंडामुळे गुंतवणूकदारांना कमी किमतीत हव्या त्या फंडात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.एनएफओमध्ये पैसे गुंतवण्याआधी कोणत्या बाबींवर लक्ष दिले पाहिजे ते आता पाहूयात. सुरुवातीला ज्या अॅसेट मॅनेटजमेंट कंपनीचा एनएफओ गुंतवणुकीसाठी निवडलाय त्या कंपनीच्या मागील एनएफओची कामगिरी तपासा. कमीत कमी पाच ते दहा वर्षातील एनएफओची कामगिरी पाहा. नवीन फंडातील फंड मॅनेजरचा मागील ट्रॅक रेकॉर्डचाही नीट अभ्यास करा.कोणताही ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध नसल्यानं जुन्या फंडापेक्षा नवीन फंडात गुंतवणूक करताना जोखीम जास्त असते. अशावेळी ऑफर डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचून नवीन फंडात गुंतवणूक करा.

हे सुद्धा वाचा

गुंतवणुकीसाठी विविध पर्याय

येत्या काही दिवसात डेट आणि इक्विटीसहित सर्व क्षेत्रात नवीन फंड येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. अशावेळी आपला उद्देश आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन फंडाची निवड करा, असा सल्ला Epsilon Money Mart चे प्रॉडक्ट आणि प्रोपोजिशन हेड नीतीन राव यांनी दिलाय. एकूणच एनएफओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी म्युच्युअल फंड कंपनीबद्दल रिसर्च केल्यानंतरच गुंतवणूक करावी. तसेच फंड हाऊसचा 5 ते 10 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासावा. हा रेकॉर्ड चेक केल्यानंतर बाजारातील चढ-उताराच्या वेळी फंडानं कोणत्या रणनितीचा वापर केला याची माहिती मिळते. ज्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो त्या फंड हाऊसचा NFO चांगला असण्याची जास्त शक्यता असते.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.