Marathi News Business Know why Crypto currency Bitcoin price fallen to lowest in Market America China
PHOTOS : Bitcoin चे दिवस संपले? एका दिवसात किमतीत 10 टक्क्यांची घट, हॅकिंगसोबतही नावाची चर्चा
सुरुवातीला जगभरात चर्चेत असलेली बिटकॉईन करंसी (चलन) सध्या गटांगळ्या खाताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून बिटकॉईनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे.
1 / 6
सुरुवातीला जगभरात चर्चेत असलेली बिटकॉईन करंसी (चलन) सध्या गटांगळ्या खाताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून बिटकॉईनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे. 8 जूनला आशियातील बाजारात बिटकॉईनची किंमत 6 टक्क्याने घटली. ही घट अशीच सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
2 / 6
एकीकडे अमेरिकेने आपल्या चलन धोरणात बदल केलाय. दुसरीकडे चीनने देखील क्रिप्टो मार्केटवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु केलेत. चीनने क्रिप्टोकरंसीच्या मायनिंगवर बंदी घातलीय. याचाही परिणाम क्रिप्टो करंसीच्या किमतीवर होताना दिसत आहे.
3 / 6
7 जूनलाही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरंसी बिटकॉइनच्या किमतीत घट झाली. हे मुल्य 35,466 डॉलरवरुन 33,221 डॉलरवर पोहचलं. बिटकॉईनच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची पडझड झालीय.
4 / 6
भारतात काम सुरू करणार आहेत या 'क्रिप्टोकर्न्सी बँका', बिटकॉइन खरेदी व विक्रीसाठी कर्ज घेण्यास असतील सक्षम
5 / 6
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील ईस्ट कोस्ट पाईपलाईन प्रोजेक्ट हॅक करणाऱ्यांनाही बिटॉईनमध्येच मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आल्याचंही समोर येतंय. त्याचाही तपास एफबीआय करत आहे.
6 / 6
कोलोनियल पाईपलाईन हॅकिंगसाठी हॅकर्सला 4.4 मिलियन डॉलर रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तपासात समोर आलंय की या हॅकर्सला देण्यात आलेल्या पैशांपैकी मोठी रक्कम बिटकॉईन स्वरुपात देण्यात आली होती. गुन्हेगारी कामासाठी वापरण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी रक्कम आहे. तेव्हापासून बिटकॉईनच्या किमतीत आणखी घट होत आहे.