Share market : ‘या’ बँकेच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल, गेल्या वीस वर्षांत दिला तब्बल 745 पट रिटर्न

कोणत्याही शेअरमध्ये (Share) गुंतवणूक (investment) करण्याअगोदर हुशार गुंतवणूकदार कंपनीचं व्हॅल्यूएशन नक्की पाहतो. चांगलं व्हॅल्यूएशन असल्यानंतर शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यताही असते. सध्याच्या परिस्थितीत तर गुंतवणूकदार (investors) व्हॅल्यूएशनच्या बाबतीत खूपच सतर्क झालेत.

Share market : 'या' बँकेच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल, गेल्या वीस वर्षांत दिला तब्बल 745 पट रिटर्न
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 2:20 AM

कोणत्याही शेअरमध्ये (Share) गुंतवणूक (investment) करण्याअगोदर हुशार गुंतवणूकदार कंपनीचं व्हॅल्यूएशन नक्की पाहतो. चांगलं व्हॅल्यूएशन असल्यानंतर शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यताही असते. सध्याच्या परिस्थितीत तर गुंतवणूकदार (investors) व्हॅल्यूएशनच्या बाबतीत खूपच सतर्क झालेत.कारण,  अनेक स्टार्टअप्स तोंडघशी पडले आहेत. बाजारात लिस्ट होताना स्टार्टअप्सच्या शेअर्सचे खूप जास्त व्हॅल्यूएशन होतं. आता स्टार्टअप्सचे शेअर्स खरेदी करण्यास कुणीही धजावत नाहीत.  त्यामुळेच गुंतवणूकदार सतर्क झालेत. मात्र, एक प्रश्न नेहमी मनात येत असतो.शेअरची व्हॅल्यूएशन खूप जास्त असूनही जबदरस्त परतावा मिळत असेल तर?  बँकिंग क्षेत्रातील असाच एक शेअर्स आहे, बँकेचं नाव आहे कोटक बँक इतर बँकेच्या तुलनेत कोटक बँकेचं व्हॅल्यूएशन खूप जास्त आहे.

सर्वाधिक एनआयएम

कोटकची प्राईस टू बुक व्हॅल्यू 3.67 पट आहे. कोटकच्या तुलनेत HDFC बँक 3.06 पट,ICICI बँक 2.93 आणि अॅक्सिस बँक 1.72 पटीनं व्हॅल्यूएशनवर सध्या ट्रेड करत आहेत. तर आता प्रश्न असा आहे की जास्त व्हॅल्यूएशन असूनही कोटक बँकेमध्ये परतावा देण्याची क्षमता आहे का? की सध्या शेअर्सची विक्री करून बाहेर पडावं? यासाठी एकदा आकडेवारी पाहूयात. सुरुवातीला पाहूयात NIM ची म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे व्याजावर बँकेला किती मार्जिन मिळत आहे. इतर दिग्गज बँकेच्या तुलनेत कोटक बँकेचा NIM सर्वाधिक आहे. म्हणजे बँक व्याजाद्वारे बक्कळ कमाई करत आहे.फक्त एवढंच नाही की कोटक बँकेचं NIM सरासरीपेक्षा जास्त आहे. कोटक बँकेला गेल्या काही वर्षांपासून जास्त NIM चा मोठा फायदाही होत आहे.

नफ्यात 23 टक्क्यांपर्यंत वाढ

रिर्टन ऑन अॅसेटच्या बाबतीतही कोटक बँक सगळ्यात पुढं आहे.आता कर्जाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कोटक बँक सर्वाधिक मजबूत बँक आहे. म्हणजेच सर्वच महत्त्वाच्या घटकांच्या बाबतीत इतर दिग्गज बँकेच्या तुलनेत कोटक बँक मजबूत असल्याचं दिसून येतंय.बँकिंग व्यवसायातील इतर घटक, उदाहरणार्थ CASA रेशिओ, अनुत्पादक कर्ज म्हणजेच NPA रेशिओ च्या बाबतीत बँकेनं सतत चांगली कामगिरी केलीये. कोटक बँकेचा कासा रेशिओ स्थिर आहे. तसेच बँकेनं अनुत्पादक कर्ज कमी करण्यावर जोर दिलाय. एवढंच नव्हे तर वार्षिक निकाल पाहिल्यास कोटक बँकेचा नफ्यातील वाढ 23 टक्क्यांवर पोहचल्याचं दिसून येतंय.

हे सुद्धा वाचा

745 पट रिटर्न

कोटक बँकेचं व्हॅल्यूएशन जास्त असण्याचे मुख्य दोन कारणं आहेत. एक म्हणजे सतत सर्वोत्तम कामगिरी आणि दुसरं म्हणजे मजबूत ग्रोथ आउटलूक आता गुतवणूकदारांनी किती कमाई केलीय? या महत्त्वाच्या मुद्याबद्दल जाणून घेऊयात. 2001 पासून कोटक बँकेनं गुंतवणूकदारांना आतापर्यंत 745 पट रिटर्न दिलाय. कोटक बँकेतील रिटर्नचा टेबल पाहिल्यास तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.सध्याच्या परिस्थितीत कोटक बँकेच्या शेअर्समध्येही घसरण झालीये. 52 आठवड्याच्या उच्चांकाची तुलना करता 20 टक्क्यानं कमी आहे.गोल्डमन सॅचनुसार गेल्या दोन वर्षात कोटक बँकेची कामगिरी ही बँक निफ्टीपेक्षा चांगली आहे.

पुढील पाच वर्षांत मार्केट कॅप दुपटीने वाढण्याचा अंदाज

2027 या आर्थिक वर्षापर्यंत कोटक बँकेच्या एकूण शेअर्सची किंमत म्हणजेच मार्केट कॅप 42 अब्ज डॉलर आहे. मार्केट कॅप 100 अब्ज डॉलर होणार असल्याचा अंदाजही गोल्डमन सॅचनं वर्तवलाय. म्हणजेच पुढील पाच वर्षात मार्केट कॅप दुप्पटीहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे.बजाज फायनान्स,SBI Card सारख्या महाग शेअर्सची तुलना केल्यास कोटक बँकेचा शेअर जवळपास 30 टक्के डिस्काऊंटवर मिळत आहे.व्याज दर वाढत असतानाही कोटक बँक फायदा घेण्याच्या स्थितीत असल्याचं ब्रोकरेज हाऊसेसचं म्हणणं आहे.सक्षम व्यवसाय आणि कमी जोखिमेमुळे बहुतांश ब्रोकर्स कोटक बँकेच्या बाबतीत बुलिश आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.