SBI च्या खातेदारांसाठी KYC आवश्यक; बँकेत जाऊ शकत नसाल तर घरून करा हे काम
केवायसीमध्ये तुम्हाला तुमची कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागतील. जर तुम्ही अद्याप बँक खात्याचे केवायसी केले नसेल, तर तुम्ही हे काम लवकरात लवकर उरकावे. आता बँकेने त्या लोकांसाठी देखील विशेष व्यवस्था केली आहे, जे बँक शाखेत जाऊ शकत नाहीत.
नवी दिल्लीः ज्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे, त्यांच्यासाठी बँकेने आवश्यक माहिती जारी केलीय. बँकेच्या खातेदारांना त्यांचे खाते KYC अपडेट करणे आवश्यक आहे. केवायसीमध्ये तुम्हाला तुमची कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागतील. जर तुम्ही अद्याप बँक खात्याचे केवायसी केले नसेल, तर तुम्ही हे काम लवकरात लवकर उरकावे. आता बँकेने त्या लोकांसाठी देखील विशेष व्यवस्था केली आहे, जे बँक शाखेत जाऊ शकत नाहीत.
केवायसी करण्यासाठी बँकेत जाणे आवश्यक आहे का?
लोकांचा असा विश्वास आहे की, केवायसी करण्यासाठी बँकेत जाणे आवश्यक आहे. परंतु आपण हे काम आपल्या घरी बसून देखील करू शकता. अशा परिस्थितीत हे जाणून घ्या की, जर तुम्हाला घरातून केवायसी करायचे असेल तर ही प्रक्रिया कशी पूर्ण करावी लागेल. केवायसीबाबत बँकेचे इतर नियम काय आहेत हेसुद्धा जाणून घ्या.
केवायसीचे काम घरी बसून कसे करता येईल का?
अलीकडेच एका एसबीआय ग्राहकाने ट्विटरद्वारे बँकेला टॅग केले आणि केवायसीचे काम घरी बसून कसे करता येईल, याची विचारणा केली. यानंतर त्याला एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे उत्तर देखील दिले आणि बँकेचे नियम सांगितले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे स्वाक्षरी करून स्कॅन अर्ज आणि केवायसी दस्तऐवज पाठवू शकता किंवा बँक शाखेत पाठवू शकता.
तर तुम्हाला तुमच्या मूळ केवायसी दस्तऐवजांसह बँकेत जावे लागेल
बँक म्हणते की, जर तुम्हाला पत्ता, फोन नंबर इत्यादींमध्ये काही बदल करायचे असतील किंवा दस्तऐवजात काही बदल असेल तर तुम्हाला तुमच्या मूळ केवायसी दस्तऐवजांसह बँकेत जावे लागेल. तसेच यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊ शकता.
@TheOfficialSBI #KYC #KYCUPDATE please help to update my father’s bank KYC at Bhikhna Pahari, Patna (Bihar) branch, and the process of documentation to update KYC without visiting to the branch. As I have been told by your costumer care to visit branch for KYC update.
— Suraj (@Surajrudra_) August 14, 2021
1 डिसेंबर 2021 पर्यंत मर्यादित KYC च्या वापरास परवानगी
बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन केवायसी दस्तऐवजासह ते पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण न झाल्यास तुमच्या खात्यातील भविष्यातील व्यवहार थांबवले जाऊ शकतात. RBI ने 1 डिसेंबर 2021 पर्यंत मर्यादित KYC च्या वापरास परवानगी दिली. आता बँका ग्राहकांच्या व्हिडीओ केवायसीद्वारे खाते उघडू शकतात. रिझर्व्ह बँकेने केवायसी अनिवार्य केले आहे. याशिवाय म्युच्युअल फंड खाती उघडणे, बँक लॉकर्स, म्युच्युअल फंड ऑनलाईन खरेदी करणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे यासाठी केवायसी आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून उद्यापर्यंत बँकेच्या सेवा 18 तास बंद, जाणून घ्या
KYC required for SBI account holders; If you can’t go to the bank, do it from home