Gold Stock : काय सांगता, येथे दडलीये सोन्याची खाण! एका झटक्यात जगाची गरिबी होणार छुमंतर

Gold Stock : संपूर्ण जगाला सोन्याचे वेड लागले आहे. भारतीयांचे सुवर्णवेड तर सर्वांनाच माहिती आहे. जगात अनेक सोन्याच्या खाणी आहेत. सोन्याचा शोध सुरुच आहे. पण याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं दडलंय की..

Gold Stock : काय सांगता, येथे दडलीये सोन्याची खाण! एका झटक्यात जगाची गरिबी होणार छुमंतर
सुवर्णसाठा
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : अवघ्या जगाला सोन्याचा (Gold) मोह का सूटत नाही. सोन्याच्या लंकेच्या कथा आपण ऐकली आहे. आजही अनेक मंदिरांना सोन्याचा मुलामा, पत्रा लावण्यात येतो. संपूर्ण जगाला सोन्याचे वेड लागले आहे. भारतीयांचे सुवर्णवेड तर सर्वांनाच माहिती आहे. जगात अनेक सोन्याच्या खाणी आहेत. सोन्याचा शोध सुरुच आहे. जगात सर्वाधिक सोने कुठे दडलं (Gold Reserve) असेल असा सवाल तुम्हाला केल्यावर, तुमचं उत्तर ठरलेलं असेल की, खाणीत सर्वाधिक सोने दडलेलं आहे. पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का तर पुढे बसणार आहे. खाणीत सोनं दडलेलं नाही. तर सोन्याचा प्रचंड साठा हा समुद्राच्या तळाशी आहे. समुद्राच्या उदरात इतके सोने दडलेलं आहे की, त्यामुळे जगाची गरिबी एका झटक्यात छुमंतर होईल.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार (Guinness World Record) पृथ्वीवर नैसर्गिकरित्या सर्वाधिक सोने हे जमिनीतील खाणीत नाही तर समुद्राच्या तळाशी आहे. जमिनीवरील खाणीतून एकूण जितके सोने काढण्यात येते, त्यापेक्षा जवळपास 100 पटीने सोने समुद्राच्या तळाशी आहे. एका अंदाजानुसार, समुद्राच्या पाण्यात जवळपास 20 दशलक्ष टन अर्थात 2 कोटी टन नैसर्गिक सोने विरघळलेल्या अवस्थेत अथवा नैसर्गिक रुपात दडलेले आहे.

समुद्राच्या पोटात दडलेल्या या सोन्याची किंमतीचा अंदाज बांधणे अवघड आहे. पण हे सोने काढण्यात यश आले तर जगाची गरिबी झटक्यात दूर होईलत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या उपलब्ध असलेल्या एकूण सोन्याच्या 100 पट सोने समुद्राच्या पोटात दडलेले आहे. 2017 मध्ये याच्या किंमतीची अंदाज बांधण्यात आला. त्यानुसार, जगाच्या एकूण सकल उत्पादनाच्या (GDP) जवळपास 10 पट जास्त आहे. हे सोने समुद्रात बाहेर काढल्यास जगाची गरिबी छुमंतर होईल.

हे सुद्धा वाचा

शास्त्रज्ञांनी सर्वाधिक सोने समुद्राच्या तळाशी असल्याचा शोध लावला आहे. पण हे सोने बाहेर काढणे सोपे काम नाही. एक लिटर समुद्राच्या पाण्यात सोन्याची मात्रा अत्यंत कमी आहे. एका लिटर पाण्यातून सोन्याचे काही अल्प कण काढता येतात. अद्याप विज्ञानाने समुद्राच्या पाण्यातून सहज सोने काढण्याचा कोणताच उपाय शोधलेला नाही.

जगभरातून आतापर्यंत किती सोने काढण्यात आले असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका अंदाजानुसार, जवळपास 2.44 लाख टन सोने आतापर्यंत काढण्यात आले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने (World Gold Council) याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, गेल्या 50 वर्षांतच खाणीतून सर्वाधिक सोने खोदून काढण्यात आले आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार, जमिनीखाली सध्या जवळपास 57 हजार मेट्रिक टन सोन्याचे भंडार दडलेले आहे. जर हे सोने काढले तर ते 23 मीटर आडव्या आणि 23 मीटर लांब सोन्याच्या विटेत सामावेल. पण समुद्राच्या तळाशी सर्वाधिक सोने लपलेले आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.