त्वरा करा! स्वस्त सोने खरेदीची आज शेवटची संधी, थेट RBI पोर्टलवरून जाणून घ्या किंमत
सरकारने जारी केलेल्या Sovereign gold bond ची सबस्क्रिप्शन घेतल्यावर गुंतवणूकदाराला फिजिकल स्वरूपात सोने मिळत नाही. विशेष म्हणजे हे सोने फिजिकल सोन्यापेक्षा सुरक्षित आहे. सध्या बाजारात 1 ग्रॅम सोन्याचा दर 4,800 रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तुम्हाला सोने स्वस्तात विकत आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारने 2021 च्या अखेरीस स्वस्तात सोने खरेदी करण्याचा पर्याय दिलाय. वर्षातील शेवटची सीरिज असलेल्या Sovereign gold bond ची खरेदी 29 नोव्हेंबर रोजी सुरू होती, परंतु आज ती 3 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. मोदी सरकारने विकलेले स्वस्त सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 4,791 रुपये निश्चित करण्यात आलीय. ऑनलाईन पेमेंट करण्यावर 50 रुपयांची सूटदेखील उपलब्ध असेल, त्यामुळे तुमच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.
मोदी सरकार सोने स्वस्तात विकतंय
सरकारने जारी केलेल्या Sovereign gold bond ची सबस्क्रिप्शन घेतल्यावर गुंतवणूकदाराला फिजिकल स्वरूपात सोने मिळत नाही. विशेष म्हणजे हे सोने फिजिकल सोन्यापेक्षा सुरक्षित आहे. सध्या बाजारात 1 ग्रॅम सोन्याचा दर 4,800 रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तुम्हाला सोने स्वस्तात विकत आहे.
तुम्ही येथून सोने खरेदी करू शकता
तुम्ही हे Sovereign gold bond NSE, BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी करू शकता. याशिवाय तुमची स्वतःची बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खासगी बँका देखील Sovereign gold bond खरेदी करण्याचा पर्याय देते. हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL) आणि पोस्ट ऑफिसमधून देखील खरेदी केले जाऊ शकते. ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकांकडून विकले जात नाही.
इतके व्याज मिळणार
Sovereign gold bond योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असेल. पुढील व्याज भरण्याच्या तारखेला 5 वर्षांनंतर बाँडमधून गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय देखील असेल. यामध्ये तुम्ही 1 ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक करू शकता. या अंकावर वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाईल.
कर सूट मिळवा
त्याच्या विक्रीवरील नफ्याला आयकर नियमांतर्गत सूट देऊन आणखी बरेच फायदे मिळतील. 2021-22 या आर्थिक वर्षातील सरकारच्या Sovereign gold bond मध्ये गुंतवणुकीचा हा चौथा भाग आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मे ते सप्टेंबरदरम्यान सहा हप्त्यांमध्ये Sovereign gold bond जारी केले जातील.
योजना 2015 मध्ये सुरू झाली
सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. Sovereign gold bond हे सरकारी बाँड आहेत. हे फिजिकल सोन्याला पर्याय म्हणून लाँच केले गेले.
संबंधित बातम्या
पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा
‘या’ बँकांमध्ये वर्षाच्या एफडीवर 6.50% पर्यंत व्याज, जाणून घ्या