SHARE MARKET: तेजीची बूम, 3 महिन्यांत 60 हजारांचा टप्पा पार; गुंतवणुकदार 30 लाख कोटींनी मालामाल
आज (सोमवारी) सेन्सेक्स 1335 अंकांच्या तेजीसह 60611 अंकावर पोहोचला. तर निफ्टी 383 अंकांच्या वधारणीसह 18053 वर बंद झाला. आजच्या तेजीमध्ये एचडीएफस, एचडीएफसी बँकेची (HDFC BANK and HDFC) सर्वाधिक भर पडली.
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (SHARE MARKET) तेजी नोंदविली गेली. बाजारातील तेजीमुळे गुंतवणुकदारांच्या गंगाजळीत मोठी भर पडली. गेल्या एक महिन्यांतील शेअर बाजारातील तेजीच्या सत्रांमुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 30 लाख कोटींची भर पडली आहे. आज (सोमवारी) सेन्सेक्स 1335 अंकांच्या तेजीसह 60611 अंकावर पोहोचला. तर निफ्टी 383 अंकांच्या वधारणीसह 18053 वर बंद झाला. आजच्या तेजीमध्ये एचडीएफस, एचडीएफसी बँकेची (HDFC BANK and HDFC) सर्वाधिक भर पडली. एचडीएफसी बँकेत 9.81 टक्के आणि एचडीएफसीत 9.15 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. आज सेंन्सेक्स वरील टॉप-30 कंपन्यांपैकी 28 तेजीसह बंद झाल्या. टायटन आणि इन्फोसिसच्या (Titan and Infosys) शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली.
गुंतवणुकदार मालामाल:
शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅप 272.48 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात मार्केट कॅपचा आकडा 267.88 लाखांवर होता. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 4.6 लाख कोटींची भर पडली आहे.
एचडीएफसीत तेजीची बूम:
आज शेअरबाजार तीन महिन्यांच्या सर्वोच्च वाढीसह बंद झाला. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेत गेल्या 13 वर्षातील नोंदविलेली सर्वाधिक तेजी आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे निफ्टी बँक 4 टक्क्यांच्या तेजीसह 38635 अंकांवर बंद झाली. फायनान्शियल्स सर्व्हिस इंडेक्समध्ये 4.64 टक्के आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये 3.92 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली.
तेजीचा डंका:
देशांतर्गत सोबतच विदेशी शेअर बाजारात तेजीचा डंका आहे. बाजारातील तेजीच्या काळात विदेशी गुंतवणुकदारांनी कोट्यावधी रुपयांच्या शेअर्स खरेदीचा सपाटा लावला आहे. रिलायन्स सिक्युरिटीजचे मिथिल शाह यांनी युक्रेन विवाद निवळल्यामुळे अमेरिकन बाजारात तेजी नोंदविली गेली आहे. त्यामुळे आशियाई बाजारात तेजीचं चित्र असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.
आजचे वधारणीचे शेअर्स (Today’s Top gainers)
• एचडीएफसी बँक (10.01%) • एचडीएफसी(9.29%) • अदानी पोर्ट्स (4.17%) • एचडीएफसी लाईफ (3.90%) • कोटक महिंद्रा (3.34%)
आजचे घसरणीचे शेअर्स (Today’s Top Losers)
• इन्फोसिस (-1.08%) • टाटा कॉन्स.प्रॉडक्ट (-0.22%) • टायटन कंपनी (-0.15%)
संबंधित बातम्या :
मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?