Naresh Goyal : राजाचा रंक होताना पाहिला का? मग नरेश गोयल यांची कथा वाचाच

Naresh Goyal : एका ट्रॅव्हल एजन्सीवर कॅशिअरची नोकरी करणारे नरेश गोयल यांनी जेट एअरवेज ही विमान सेवा कंपनी सुरु केली. नोकरदार वर्गातून ते थेट एका विमान कंपनीचे मालक झाले. पण त्यांनाच आता ईडीने एका प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्या या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. कसा होता हा प्रवास..

Naresh Goyal : राजाचा रंक होताना पाहिला का? मग नरेश गोयल यांची कथा वाचाच
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 5:59 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : काही वर्षांपूर्वी कोट्यवधीं रुपयात खेळणारे नरेश गोयल (Naresh Goyal Story) आज तुरुंगाच्या गजाआड आहेत. बँक फ्रॉड प्रकरणात त्यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. नरेश गोयल यांनी आईकडून पैसे उधार घेत जेट एअरवेजची सुरुवात केली होती. जेट एअरवेजच्या आयपीओनंतर फोर्ब्सने नरेश गोयल यांची एकूण संपत्ती 1.9 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय 157,17,55,05,000 रुपये इतकी असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या कंपनीचे विमान आकाशातून जमिनीवर उतरले ते उडालेच नाही. त्यांना मोठा फटका बसला. करिअरच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी 300 रुपयांवर नोकरी केली होती. त्यानंतर ते जेट एअरवेजचे (Jet Airways) मालक झाले. त्यांच्या राजा ते रंक होण्याचा असा आहे प्रवास

1967 मध्ये 300 रुपयांवर नोकरी

पंजाबमधील संगरुर याठिकाणी डिसेंबर 1949 मध्ये नरेश गोयल यांचा जन्म झाला. दागिने विक्रीचा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. पण वडिलांच्या निधनाने त्यांचा घरावर अडचणींचा डोंगर कोसळला. आर्थिक संकटांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर मामाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीवर कॅशिअरची नोकरी सुरु केली. तेव्हा 300 रुपये पगार होता.

हे सुद्धा वाचा

इराकी विमान सेवेत दाखल

ते लेबनॉनच्या आंतरराष्ट्रीय एअरलाईन्ससोबत जोडल्या गेले. त्यानंतर 1969 मध्ये ते इराकच्या विमान सेवेत पीआर मॅनेजर म्हणून रुजू झाले. 1971 मध्ये रॉयल जॉर्डन एयरलाईन्समध्ये (Royal Jordanian Airlines) ते रुजू झाले. याठिकाणी अनेक पदांवर कामाचा त्यांनी अनुभव घेतला.

आईकडून घेतले पैसे उधार

स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरु करण्यासाठी त्यांनी आईकडून पैसे उधार घेतले. जेटएअर नावाने 1974 मध्ये त्यांनी एजन्सी सुरु केली. या एजन्सीने फ्रान्स, ऑस्ट्रिया, कॅथी पॅसिफिक एअरलाईन्ससाठी काम सुरु केले. 1991 मध्ये केंद्र सरकारने ओपन स्काईज पॉलिसी अंगिकारली. तेव्हा गोयल यांनी 1992 मध्ये एअरलाईन्स कंपनी सुरु केली. एजन्सीचे नाव त्यांनी जेट एअरवेज असे बदलले. त्याच्या पुढील वर्षात विमान सेवा सुरु झाली. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यात आली. 2007 मध्ये त्यांनी एअर सहारा खरेदी केले. पुढील तीन वर्षे ही कंपनी भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. पण नंतर त्यांच्या अडचणी वाढल्या. मार्च 2019 मध्ये त्यांना संचालक मंडळावरुन बाजूला व्हावे लागले.

मग तुरुंगवारी

जेट एअरवेजचे व्यवस्थापन गडबडले. नरेश गोयल यांच्यावर ईडीचा फास आवळल्या गेला. फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कॅनेरा बँकेच्या तक्रारीनंतर अडचणीत आणखी वाढ झाली. बँकेने जेट एअरवेजला 848.86 कर्ज मंजूर केले होते. त्यातील 538.62 कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्यातूनच त्यांना अटक झाली.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.