Leave Encashment : किती सुट्ट्या होतील इनकॅश ? या आधारावर कंपन्या जमा करतात वर्षाकाठी रक्कम

Leave Encashment : वर्षभरात सुट्यांच्या माध्यमातून तुम्हाला कितीची कमाई करता येते?

Leave Encashment : किती सुट्ट्या होतील इनकॅश ? या आधारावर कंपन्या जमा करतात वर्षाकाठी रक्कम
सुट्या होतील इनकॅशImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 6:57 PM

नवी दिल्ली : कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना (Employees) सुट्टी मिळतेच. यामध्ये अशा ही काही सुट्या (Leave) असतात, ज्या तुम्ही घेतलेल्या नसतात. मग कंपनी त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे देते. पगार पत्रकानुसार (Salary Structure) , तुमच्या सुट्यांची माहिती देण्यात येते. तसेच सुट्या नाही घेतल्या तर त्याचा मोबदल्याविषयी पण माहिती देण्यात येते. त्याला लीव्ह इनकॅशमेंट (Leave Encashment) असे म्हटले जाते. परंतु एका वर्षात किती सुट्या तुम्हाला इनकॅश करता येतात. याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्या देतात. त्यामध्ये आजारपणाची सुट्टी (Sick Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), अर्जित रजा (Earned Leave), विशेष रजा (Privilege Leave) यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. या सुट्या तुम्हाला वर्षभरात घेता येतात.

जर तुम्ही वर्षभरात या सुट्या घेतल्या नाहीत. तर त्या व्यपगत, संपुष्टात येतात. यामध्ये आजारपण आणि प्रासंगिक रजांचा समावेश असतो. परंतु, अर्जित रजा आणि विशेष रजांच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजेच तुम्ही या सुट्या इनकॅश करु शकतात. प्रत्येक कंपनीत याविषयीचा नियम वेगळा आहे.

हे सुद्धा वाचा

साधारणपणे एका वर्षात जास्तीत जास्त 30 सुट्या इनकॅश करता येतात. सरकारी नोकरदारांनाही एवढ्याच सुट्या इनकॅश करण्याचा अधिकार आहे. पण याविषयी खासगी कंपन्यांच्या नियमात एकसूत्रता नाही. काही कंपन्या वर्ष संपल्यावर ही रक्कम कर्मचाऱ्यांना देतात. तर काही कंपन्या राजीनामा दिल्यानंतर ही रक्कम जमा करतात.

लीव्ह इनकॅशमेंट कराच्या परिघात येते. हे कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच एक भाग मानण्यात येतो. नोकरीत असतानाच वर्षाच्या शेवटी सुट्यांची रक्कम तुम्हाला हवी असल्यास तो पगाराचा भाग मानण्यात येतो. वर्षात एकदाच या सुट्या रीडिम करता येतात.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.