मुंबई : आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओची (LIC IPO) तयारी जोरात सुरू आहे. या मेगा IPO बद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या मेगा IPO मध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्या देशातील 14 टक्के लोकसंख्येचा निश्चितपणे सहभाग असेल असा LIC चा अंदाज आहे. यामध्ये एलआयसीचे पॉलिसीधारक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननुसार (Life Insurance Corporation), एलआयसी या गुंतवणूकदारांकडून 25 हजार कोटींचा निधी गोळा करू शकते.
वैयक्तिक गुंतवणूकदारांची सरासरी गुंतवणूक 30-40 हजार
IPO मध्ये सामील असलेल्या सर्व वैयक्तिक गुंतवणूकदारांची सरासरी गुंतवणूक 30-40 हजार दरम्यान असू शकते. LIC च्या अंदाजानुसार 75 लाख ते 1 कोटी किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये सहभागी होऊ शकतात. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, जीवन विमा कंपनीचा अंदाज आहे की किरकोळ गुंतवणूकदारांचे सरासरी तिकीट आकार 30-40 हजारांच्या दरम्यान असू शकते. सरकारचा अंदाज आहे की भारतात सध्या 73.8 दशलक्ष म्हणजेच 7.38 कोटी डिमॅट खातेधारक आहेत.
LIC ने आपल्या पॉलिसी धारकांसाठी या IPO मध्ये आरक्षण दिले आहे. परिस्थितीत पॉलिसीधारक मोठ्या प्रमाणात डिमॅट खाती उघडत आहेत. त्यामुळे देशातील एकूण डिमॅट खातेदारांची संख्या 8 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की हा IPO $8 बिलियन म्हणजेच 60 हजार कोटी असेल. हा IPO 11 मार्च रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. हे अँकर गुंतवणूकदारांसाठी 11 मार्च रोजी उघडेल, तर इतर गुंतवणूकदारांसाठी ते दोन दिवसांनी उघडेल.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात IPO ची शक्यता
मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याला नियामकाशी संबंधित सर्व मान्यता मिळतील. मंजुरी मिळाल्यानंतर, IPO साठी किंमत बँड निश्चित केला जाईल. सरकार चालू आर्थिक वर्षात आयुर्विमा महामंडळाचा (LIC) IPO आणण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रानुसार, त्याचे वेळापत्रक बदलणे शक्य आहे. तसे ते टार्गेट वेळेवर आणण्यासाठी अगोदरच प्रयत्न केले जात आहेत. एलआयसीने सेबीकडे डीआरएचपी सादर केला आहे. IPO प्रॉस्पेक्टनुसार, सरकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमधील 5 टक्के हिस्सा विकणार आहे.
संबंधित बातम्या :
अत्यंत महत्वाची माहिती…गुंतवणूक करण्याच्या अगोदर जाणून घ्या व्याज उत्पन्नावर कर कसा लागू होतो!
तरूण मंडळी विकत घेत आहेत घर, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये घराची वाढू लागलीय मागणी!