एलआयसीच्या आयपीओत सूट पाहिजे… आजच ‘या’ गोष्टींची पूर्तता करा…

एलआयसीचा बहुप्रतिक्षीत आयपीओ मार्चमध्ये आणला जाणार आहे. यात एलआयसी पॉलिसीधारकांना सुट मिळून स्वस्तामध्ये शेअर्स खरेदी करण्याची संधी असणार आहे. परंतु यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्‍यक राहणार आहे.

एलआयसीच्या आयपीओत सूट पाहिजे... आजच ‘या’ गोष्टींची पूर्तता करा...
एलआयसी आयपीओवर युद्धाचा परिणाम?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 8:22 AM

गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये दोनच गोष्टींची चर्चा आहे, एक रशिया-युक्रेन तणावाची तर दुसरी म्हणजे एलआयसीच्या आयपीओची…(Lic Ipo) एलआयसी आपला आयपीओ मार्चमध्ये आणण्याची शक्यता आहे. या आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना (Policyholders) सुट देण्याचा निर्णय एलआयसीकडून घेण्यात आला आहे. या माध्यमातून पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. परंतु यासाठी त्यांना काही तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. या शिवाय आपल्या पाल्यांच्या नावे काढण्यात आलेल्या एलआयसी पॉलिसीवरही पालकांना (parents) या संधीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुलांच्या नावावर पॉलिसी असेल तर आयपीओवरील सवलतीचा लाभ पालकांना घेता येणार आहे. याबाबत या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारी आहे. यामध्ये काही भाग एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून त्यांना स्वस्तात शेअर्स दिले जातील. मात्र यासाठी त्यांना आज दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्यांचे पॅन पॉलिसीशी लिंक केलेले आहेत आणि त्यांचे डिमॅट खाते आहे फक्त तेच पॉलिसीधारक यासाठी अर्ज करू शकतात. एलआयसी त्यांच्या पॉलिसीधारकांना पाच टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकते. या आयपीओमधील पाच टक्के कर्मचार्‍यांसाठी आणि 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव कोटा देण्यात आला आहे. एलआयसीच्या 26 कोटी पॉलिसीधारकांसाठी 3.16 कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आयपीओ राखीव

एकूण 35 टक्के आयपीओ एलआयसीच्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहेत. म्हणजेच, जो पॉलिसीधारक जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंतच्या शेअर्ससाठी बोली लावू शकतो. दोन्ही अर्ज एकाच डिमॅट खात्यातून केले असले तरी ते वैध मानले जाणार आहेत. पॉलिसीधारकांसाठी कोणताही लॉकइन कालावधी नसेल आणि ते लिस्टींगच्या दिवशीच शेअर्स विकू शकतात. पॉलिसीधारकांचे स्वतःच्या नावावर डीमॅट खाते असावे. तसेच, त्याने 28 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये पॅन अपडेट करणे आवश्यक आहे. पॉलिसी 13 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेली असावी. नॉमिनी आणि मृत पॉलिसीधारकाचा लाभ घेणारा जोडीदार यासाठी अर्ज करू शकणार नाही.

याप्रमाणे अपडेट करा पॅन

1) LIC वेबसाइट https://licindia.in/ किंवा https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/ वर जा.

2) होम पेजवर, ‘ऑनलाइन पॅन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे.

3) ऑनलाइन पॅन नोंदणीवरील ‘प्रोसीड’ बटणावर क्लिक करा.

4) तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.

5) बॉक्समध्ये तुमचा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

6)’Get OTP’ वर क्लिक करा.

7) OTP सबमिट करा.

पॅन-एलआयसीचे स्टेटस तपासा

1) https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.

2) तुमचा पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन प्रविष्ट करा. त्यानंतर कॅप्चा टाका आणि सबमिट करा.

डिमॅट खाते

कोणत्याही आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी किंवा शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. भारतात NSDL आणि CDSL या दोन डिपॉझिटरीज आहेत. या ठेवींमध्ये अनेक वित्तीय संस्था सहभागी आहेत. त्यांना ‘डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स’ म्हणतात. यापैकी कोणत्याही वापरून डिमॅट खाते उघडता येते. पॉलिसीधारकाचे आधीपासून डिमॅट खाते असल्यास, नवीन उघडण्याची गरज नाही.

पालक मुलांच्या पॉलिसीवरुन सवलतीस पात्र

एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या क्विझमध्ये विमाधारकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. पॉलिसीधारकांना आयपीओत सवलत जाहीर झाल्यानंतर आता मुलांच्या नावावर पॉलिसी असेल तर आयपीओवरील सवलतीचा लाभ कोणाला मिळणार, असा प्रश्नही लोकांच्या मनात निर्माण होत आहे. अल्पवयीन पॉलिसीधारकांच्या बाबतीत, प्रस्तावक हा पॉलिसीचा मालक मानला जातो.

अशा प्रकारे, ज्यांनी पॉलिसी प्रस्तावित केली आहे, ते पॉलिसीधारक आहेत आणि ते आयपीओतील आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत. दरम्यान, एलआयसीने म्हटले आहे की दोन संयुक्त पॉलिसीधारकांमध्ये दोघांपैकी कोणीही समान पॉलिसीधारक आयपीओतील आरक्षणासाठी अर्ज करू शकतो. इतर भागीदार सामान्य किरकोळ श्रेणीसाठी अर्ज करू शकतात. या IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के हिस्सा वेगळा ठेवण्यात आला आहे. त्यांना ‘फ्लोअर प्राईस’मध्ये काही सूटही मिळेल.

संबंधित बातम्या :  पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसा गुंतवा, बचतीचा सुवर्णमध्य साधा

मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या ‘एलआयसी’च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.