चांगल्या गुंतवणुकीवर आयुष्यभर पैसे कमवाल, LIC ची सगळ्यात भारी योजना
21 ऑक्टोबर 2020 पासून ही योजना तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.
नवी दिल्ली : LIC (Life Insurance Corporation) प्रत्येक वेळी त्यांच्या ग्राहकांसाठी खास योजना आणत असते. आताही कंपनीने अशीच योजना आणली आहे, ज्यामध्ये ग्राहकांची आयुष्यभराची चिंता मिटणार आहे. यावेळी LIC ने ‘नवीन जीवन शांती डिफर्ड अॅन्युटी’ (New Jeevan Shanti deferred annuity plan) योजना आणली आहे. 21 ऑक्टोबर 2020 पासून ही योजना तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. (LIC New Jeevan Shanti Scheme Launch know the benefits here)
ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, एकल प्रीमियम, डिफर्ड अॅन्युटी प्लान आहे. LIC च्या या खास योजनेमध्ये कर्ज घेण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही अतिशय उत्तम योजना आहे. एलआयसी (Life Insurance Corporation) ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन जीवन शांती डिफर्ड अॅन्युटी योजनेसाठी वार्षिक दर हमी पॉलिसीच्या सुरूवातीसच दिली जाते.
योजनेचा पहिला पर्याय या प्लाननुसार सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युटीचा पहिला पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायात डिफरमेंट कालावधीनंतर अॅन्युटी पेमेंट अॅन्युटी मिळवणाऱ्याला तहहयात मिळेल. जर या व्यक्तीचा दुर्देवाने मृत्यू झाला तर त्याच्या उत्तराधिकाऱ्याला त्याचा लाभ देण्यात येणार आहे.
फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा
कोण घेऊ शकतं जॉइंट लाइफ अॅन्युटी जॉइंट लाइफ अॅन्युटीमध्ये एका कुटुंबातील केवळ दोन जणांमध्ये घेतली जाऊ शकते. जसं की, आजी-आजोबा, आई-बाबा, दोन मुलं, दोन नातवंड, पती-पत्नी किंवा बहिण-भाऊ
खर्च करावे लागतील 1,50,000 रुपये या योजनेला खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 150000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अॅन्युटीला तुम्हाला वर्षाला, 6 महिन्याला, 3 महिन्याला आणि महिन्याला असे पर्याय निवडू शकता. ही योजना खरेदी करण्यासाठी पर्याय निवडण्याचा अधिकार खातेधारकाराला आहे. यामध्ये किमान वार्षिक उत्पन्न 12,000 रुपये आहे. तर जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही.
(LIC New Jeevan Shanti Scheme Launch know the benefits here)
विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा
काय आहे वयोमर्यादा? 30 वर्ष ते 79 वयोगटातील ही योजना घेऊ शकतात.
किती आहे डेफरमेंट कालावधी? यामध्ये किमान कालावधी एक वर्ष आणि जास्तीत जास्त कालावधी 12 वर्षे असतील.
LIVETV- गृहमंत्री अनिल देशमुख लाईव्ह – राज्य सरकारने निर्णय घेतलाय, यापुढे CBI महाराष्ट्राच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करु शकणार नाही, CBI ला जे काही करायचं आहे, त्यासाठी आता राज्याची परवानगी घ्यावी लागेल https://t.co/ImprYhMJl7 @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/VKZU14PBC3
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2020
(LIC New Jeevan Shanti Scheme Launch know the benefits here)