LIC च्या 29 कोटी पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी, नवा नियम लागू, काय होणार परिणाम?
आजपासून (10 मे) एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करावे लागणार आहे. (LIC New Working Policy apply from today)
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) मध्ये वर्किंग डेचा नवीन नियम आजपासून लागू करण्यात आला आहे. आजपासून (10 मे) एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करावे लागणार आहे. तसेच दर शनिवारी एलआयसी कार्यालय बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने 15 एप्रिलला याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शनिवारी रविवारी एलआयसीच्या सर्व शाखांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (LIC New Working Policy apply for today)
नव्या बदलानुसार, आजपासून LIC ची कार्यालये आठवड्यातून पाच दिवस सुरु राहणार आहे. आठवड्याच्या सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत खुली असतील. एलआयसी आपल्या ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरवते. त्यामुळे ग्राहक त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://licindia.in/ वर ऑनलाईन कामे करू शकता. या व्यतिरिक्त कोरोना संकटावेळी ग्राहकांच्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर एलआयसीने काही अटींमध्ये थोडी शिथिलता जाहीर केली आहे.
death claim च्या नियमावलीत शिथीलता
तसेच एलआयसीने death claim लवकर करता यावे, यासाठी काही नियम शिथील केले आहेत. कोरोना काळात जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पालिकेच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या जागी काही पर्यायी पुरावे देण्याची सुविधा दिली आहे.
यात कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र, डिस्चार्ज Summery, मृत्यूची वेळ किंवा तारीख असलेले मृत्यूचे प्रमाण देऊ शकतात. एलआयसी वर्ग -1 अधिकारी किंवा 10 वर्षांचा अनुभव असलेले विकास अधिकारी, अंत्यसंस्कार प्रमाणपत्र, दफन यासारखे मृत्यूचे दाखला देणारे प्रमाणपत्रही दिले जाऊ शकतात.
जवळच्या LIC शाखेत कागदपत्रं जमा करता येणार
कोरोना साथीच्या ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेते. त्यानुसार एलआयसीने क्लेम सेटलमेंटसाठी मृत्यू प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे सादर करण्याचा दिलासा दिला आहे. आता अर्जदार त्यांच्या जवळच्या कोणत्याही एलआयसी शाखेत आणि कागदपत्रांची कागदपत्रे पाहू शकतात. तसेच आजीवन प्रमाणपत्राच्या तारखेसाठी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांनी ईमेलद्वारे पाठविलेले जीवन प्रमाणपत्रे देखील स्वीकारली जातील, अशी सूट देण्यात आहे. (LIC New Working Policy apply for today)
कोरोना महामारीत शेतीनं तारलं, माढयाच्या युवा शेतकऱ्यानं लाखो रुपयांचा आंबा थेट युरोपला पाठवलाhttps://t.co/xWNr3mOrfH#Corona | #agriculture | #Farmer | #KesarMango | #Farmstories
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना संकटात ईपीएफओकडून खूशखबर; सदस्यांना 7 लाख रुपयांचे कोरोना विमा कवच
अक्षय तृतीयेला सोने, बॉन्ड्स किंवा ईटीएफमध्ये करा गुंतवणूक, 2-3 महिन्यांत मिळेल जबरदस्त परतावा
कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी दिले, टाटा ग्रुपनं आता संसर्ग रोखण्यासाठी ‘हा’ मार्ग सांगितला