LIC IPO : आयपीओ येण्यापूर्वीच विक्रमी कमाई, गेल्या आर्थिक वर्षातील सहामाहीत 1,437 कोटींचा नफा

विमा क्षेत्रातील दादा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने अर्थात एलआयसीच्या आयपीओच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणुकदारांसाठी मोठी अपडेट आहे. एलआयसीने चालू आर्थिक वर्षात कमाईचा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत नवीन व्यवसाय वृद्धी 554 टक्के नोंदवली गेली तर गेल्या आर्थिक वर्षात सहामाहीसाठी हाच आकडा 395 टक्के होता. 

LIC IPO : आयपीओ येण्यापूर्वीच विक्रमी कमाई, गेल्या आर्थिक वर्षातील सहामाहीत 1,437 कोटींचा नफा
एलआयसी आयपीओ
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 9:01 AM

भारतीय विमा क्षेत्रातील दमदार खेळाडू एलआयसीने व्यवसायात जोरदार कामगिरी केली आहे. एलआयसीच्या बहुप्रतिक्षेत आयपीओची (IPO) गुंतवणुकदार वाट पाहत असताना, एलआयसीच्या कमाईच्या आकड्यांवरही गुंतवणुकदारांचे (Investors) बारीक लक्ष होते. त्यांच्यासाठी फार महत्वाची अपडेट समोर आली आहे. एलआयसीने नफ्याचा (LIC Profit) आलेख गेल्यावर्षीपेक्षा उंचावला आहे. कोरोना परिस्थिती असताना नवीन व्यवसाय वृद्धीत कंपनीने मोठी भरारी घेतली आहे.  एलआयसीने चालू आर्थिक वर्षात कमाईचा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत नवीन व्यवसाय वृद्धी 554 टक्के नोंदवली गेली तर गेल्या आर्थिक वर्षात सहामाहीसाठी हाच आकडा 395 टक्के होता. चालु आर्थिक वर्षातील नफ्याचा आकड्यांनी एलआयसीने बाजारात आत्मविश्वासाचे वातावरण तयार केले आहे.  एलआयसीचा आयपीओ कधी येईल याची उत्सकुता तर गुंतवणुकदारांना आहेच, पण आता कमाईच्या आकड्यांनी गुंतवणुकदारांचा उत्साह वाढविला हे मात्र नक्की.

एलआयसीच्या कामगिरीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) निव्वळ नफा 1,437  कोटी रुपये झाला आहे. यासह कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 6.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.  एलआयसीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO ) लवकरच येण्याची अपेक्षा आहे. गुंतवणुकदारांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

एलआयसीने मंगळवारी आकडेवारीची माहिती दिली. याविषयीच्या दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या सहामाहीत आपल्या नवीन व्यवसायाची प्रीमियम वाढ 554.1 टक्के राहिली आहे, जी एक वर्षापूर्वी याच कालावधीत 394.76 टक्के होती.

सहामाही कालावधीत कंपनीचा एकूण निव्वळ प्रीमियम एप्रिल-सप्टेंबर 2021 मधील 1.84 लाख कोटी रुपयांवरून 1,679 कोटी रुपयांनी वाढून 1.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या एकूण प्रीमियममध्ये 17,404 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात गुंतवणुकीतून कंपनीचे उत्पन्न 3.35  लाख कोटी रुपयांवर पोहोचले

पहिल्या सहामाहीत गुंतवणुकीतून कंपनीचे एकूण उत्पन्न 15,726  कोटी रुपयांनी वाढून 1.49  लाख कोटी रुपयांवर पोहोचले

कंपनीने म्हटले आहे की, व्याज, लाभांश आणि भाड्यातून (एकूण) मिळणारे उत्पन्न सहामाही वर्षात 10,178  कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गुंतवणुकीच्या विक्री/माघारीतून मिळणाऱ्या नफ्यावरील उत्पन्न वाढून 10,965  कोटी रुपयांवर पोहोचले

या काळात एलआयसीचे भागभांडवल वाढून 6,325  कोटी रुपये झाले. समीक्षाधीन कालावधीत विमा कंपनीच्या वैयक्तिक आयुष्यासाठीचा एकूण प्रीमियम (नॉन लिंक्ड) 7,262  कोटी रुपयांनी वाढून 1.13  लाख कोटी रुपयांवर पोहोचला

आयपीओ किती काळ येऊ शकतो?

एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एलआयसीच्या आयपीओ कधी येऊन धडकणार याची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे. इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75  लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि म्हणूनच सरकारला या आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ लवकरात लवकर बाजारात उतरवायचा आहे.

संबंधित बातम्या :

नाव मोठं लक्षण खोटं! नावाजलेल्या 16 कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कोणते आहेत ते IPO?

आता सरकारी कंपन्यांना करणार सोन्याहून पिवळे,  ‘या’ युक्तीने चमकणार सरकारी कंपन्याचे शेअर्स

12 दिवसांत केलं मालामाल, कोणत्या शेअरनं केली कमाल? दामदुप्पट कामगिरी करणाऱ्या शेअरची खबरबात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.