AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी (LIC IPO) लवकरच आपला आयपीओ (IPO) आणणार आहे. आयपीओनंतर एलआयसी आपल्या पॉलिसी धोरणांमध्ये (Changes in policy) बदल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एसआयसीच्या नव्या धोरणांचा मोठा फटका हा खासगी विमा कंपन्यांना बसू शकतो.

आयपीओनंतर 'एलआयसी' व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!
एलआयसी आयपीओ
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 11:43 PM
Share

नवी दिल्ली : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी (LIC IPO) लवकरच आपला आयपीओ (IPO) आणणार आहे. आयपीओनंतर एलआयसी आपल्या पॉलिसी धोरणांमध्ये (Changes in policy) बदल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एसआयसीच्या नव्या धोरणांचा मोठा फटका हा खासगी विमा कंपन्यांना बसू शकतो. आयपीओबाबत एलआयसीने सेबीकडे दाखल केलेल्या अर्जाच्या तपशीलाचे विश्लेषण केल्यानंतर स्विस ब्रोकरेज फर्म क्रेडिट सुइसच्या वतीने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. क्रेडिट सुइसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आयपीओनंतर एलआयसीच्या पॉलिसी धोरणांमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका हा खासगी विमा कंपन्या एसबीआय लाइफ, आयसीआयसीआय, एचडीएफसी लाइफ आणि मॅक्स लाइफ सारख्या आयुर्विमा कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. एलआयसीमध्ये झालेल्या या नव्या बदलामुळे खासगी विमा कंपन्याचे नुकसान होऊ शकते.

मार्जिनमध्ये वाढ

या अहवालात पुढे म्हटले आहे की, एलआयसीने आपले मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीने आपले मार्जिन वाढवून सात टक्क्यांहून 9.9 टक्क्यांवर आणले आहे. सरकारने सरप्लस आणि नफा वितरण नियमांमध्ये बदल केल्याने कंपनीचा मार्जिन वाढवण्याचा मार्ग सोपा झाला आहे. याचा फायदा हा एलआयसीला होणार आहे. दरम्यान देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आपण उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर खासगीकरणाला चालना मिळाली. मात्र अशाही स्थितीमध्ये विमाधारकांचा एलआयसीवरील विश्वास कायम आहे. देशभरातील एकूण विमाधारकांपैकी सुमारे 66 टक्के विमा पॉलिसी या एलआयीमध्ये आहेत. तर 44 टक्के विमा पॉलिसी या खासगी कंपन्यांकडे आहे.

कोविडच्या काळात विमा पॉलिसींची संख्या वाढली

देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या या अनपेक्षित संकटामुळे अनेकापुढे आर्थिक संकट उभे राहिले. कोरोना रुग्णांच्या उपचारावर मोठ्याप्रमाणात खर्च झाला. अचानक अशाप्रकारचे संकट उभे राहिल्यास काहीतर संरक्षण हवे या उद्देशाने या काळात अनेकांनी हेल्थ पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे या दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसिच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या

अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?

महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

तुम्हाला माहित आहे का वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळते; जाणून घ्या कोणकोणत्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.