LIC ची जबरदस्त योजना! 2582 रुपयांच्या बचतीवर मिळणार 1 कोटी, दरमहा 6 हजारांची पेन्शन
ही पॉलिसी घेताना विमाधारक विमा रक्कम आणि प्रीमियम पेमेंट टर्म निवडतो. म्हणजेच किती वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि किती लाखांचा विमा काढला जाईल, हे आधीच ठरवले जाते. पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटची मुदत संपताच विमाधारकाला वार्षिक पेन्शन म्हणून विमा रकमेच्या 8% पैसे मिळते.
नवी दिल्लीः एलआयसीच्या काही विशेष पॉलिसीमध्ये जीवन उमंग पॉलिसीचे नाव आहे. त्याचा टेबल क्रमांक 945 आहे. एलआयसीची जीवन उमंग ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसींपैकी एक आहे. या अंतर्गत विमाधारकाला संपूर्ण आयुष्याचं संरक्षण मिळते. विमा संरक्षणाचा लाभ पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत चालू राहतो.
ही पॉलिसी घेताना विमाधारक विमा रक्कम आणि प्रीमियम पेमेंट टर्म निवडतो. म्हणजेच किती वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि किती लाखांचा विमा काढला जाईल, हे आधीच ठरवले जाते. पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटची मुदत संपताच विमाधारकाला वार्षिक पेन्शन म्हणून विमा रकमेच्या 8% पैसे मिळते. ही पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध आहे. जेव्हा पॉलिसीधारक वयाची 100 वर्षे पूर्ण करतो, तेव्हा पेन्शन थांबते आणि पॉलिसी परिपक्वतेपर्यंत पोहोचते. याचा अर्थ असा की, पॉलिसीची पेन्शन विम्यासाठी वापरली जाते आणि परिपक्वता पैसे पुढील काळासाठी वापरले जातात.
पॉलिसी कोणासाठी खास?
ही पॉलिसी त्या लोकांसाठी आहे, ज्यांना पॉलिसीदरम्यान पेन्शन घ्यायचे आहे आणि जाता जाता त्यांच्या कुटुंबाला मोठी रक्कम द्यायची आहे. ही एक मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे, ज्यात पॉलिसीधारकाला निवडलेल्या पॉलिसी मुदतीपेक्षा कमी दराने प्रीमियम भरावा लागतो. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला वेस्टेड रिव्हिजनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस मिळतो. ही पॉलिसी घेण्यासाठी 4 पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात 15, 20, 25 आणि 30 वर्षे पॉलिसी घेता येते. 90 दिवसांपासून 55 वर्षांपर्यंतचे लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. म्हणजेच जर एखादे मूल 90 दिवसांचे असेल, तर तुम्ही त्याच्या नावाने जीवन उमंग पॉलिसी खरेदी करू शकता. विमाधारकाचे वय 100 वर्षे झाल्यावर या पॉलिसीला परिपक्वता मिळेल. कमीत कमी 2 लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागते. जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
प्रीमियम कधी भरला जातो?
या पॉलिसीअंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक हप्ते भरता येतात. 2 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. कर्जाची रक्कम पॉलिसी किती वर्षे चालली आहे आणि प्रीमियम भरला आहे यावर अवलंबून आहे. या पॉलिसीअंतर्गत 5 रायडर्स उपलब्ध आहेत, जे अपघात किंवा इतर जोखमीपासून संरक्षण प्रदान करतात. यात एक प्रीमियम माफी लाभ रायडर आहे जो आपल्या मुलासाठी घेतला पाहिजे. दुर्दैवाने प्रीमियम भरणा करणारा जर अकाली जग सोडून गेला, तर मुलाला प्रीमियम माफी रायडरचा लाभ मिळतो आणि त्याचे संपूर्ण प्रीमियम माफ केले जाते. या पॉलिसीमध्ये आयकर कलम 80 सी अंतर्गत कर लाभाची सुविधा उपलब्ध आहे.
मॅच्युरिटीवर तुम्हाला किती पैसे मिळतील?
हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा 30 वर्षांच्या रमेशने 10 लाख रुपयांच्या विमा रकमेची पॉलिसी घेतली. त्याने प्रीमियम पेमेंट टर्म म्हणून 30 वर्षे निवडलीत. त्यानुसार पॉलिसी कालावधी 100-30 म्हणजे 70 वर्षे असेल. जर रमेशने मासिक प्रीमियम भरला तर त्याला दरमहा 2582 रुपये किंवा वार्षिक प्रीमियम भरल्यास 30,326 रुपये भरावे लागतील. त्यानुसार रमेशला त्याच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीत 9,10,448 रुपये भरावे लागतील. ही पॉलिसी 30 वर्षांनंतर प्रीमियम भरणे बंद करेल आणि रमेश त्यावेळी 60 वर्षांचा असेल.
रमेश जिवंत असेपर्यंत ही पेन्शन उपलब्ध
जेव्हा रमेश 60 वर्षांचा होईल, तेव्हा त्याला आता दरवर्षी 80,000 रुपये किंवा दरमहा 6.5 हजार रुपये पेन्शन मिळेल. रमेश जिवंत असेपर्यंत ही पेन्शन उपलब्ध असेल. रमेश 100 वर्षांचा झाल्यावर या पॉलिसीला परिपक्वता मिळेल. पॉलिसीची परिपक्वता झाल्यावर, रमेशला 10,000 रुपये विमा रक्कम, 89,20,000 रुपये बोनस म्हणून मिळतील. अशा प्रकारे, रमेशला पॉलिसीच्या परिपक्वतावर 99,20,000 रुपये मिळतील. रमेशने प्रीमियम म्हणून 9,10,448 रुपये दिले होते परंतु परिपक्वता झाल्यावर त्याला सुमारे 1 कोटी रुपये मिळाले.
संबंधित बातम्या
खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या वर्षी पगार जबरदस्त वाढणार
तुमचे वेतन आणि बँकेत असलेल्या पैशांसंदर्भातील नियम 1 तारखेपासून बदलणार, आपल्यावर काय परिणाम?
LIC’s awesome plan! 1 crore on savings of Rs. 2582, pension of Rs. 6,000 per month